कलिंगड खाऊन कुटुंब संपलं; आता डोकाडियाच्या मुलीचा 10 वीचा निकाल आला समोर, किती टक्के मिळाले?

टरबूज मृत्यू प्रकरण मुंबई : मुंबईच्या पायधुनीतील डोकाडिया कुटुंबातील (Dokadia Family) आयेशा डोकाडिया दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाली. 16 वर्षीय आयेशा डोकाडिया 70 टक्क्यांनी उत्तीर्ण झाल्याची माहिती समोर आली आहे.  राज्यात 8 मे रोजी दहावीचा निकाल जाहीर झाला. (Watermelon Death Case)

आयेशा डोकाडियाला फॅशन डिझायनिंगमध्ये करियर करण्याची इच्छा होती. 26 एप्रिलला डोकाडिया कुटुंबातील चौघांचाही उंदीर मारण्याच्या औषधाने दुर्दैवी मृत्यू झाला. पोलीस या प्रकरणाचा तपास करून असून विष चौघांच्याही शरीरात कसं गेलं, हा आत्महत्येचा प्रकार आहे की घातपाताचा, याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. (Watermelon Death Case)

डोकाडिया कुटुंब संपण्यामागील नेमकं कारण काय? (टरबूज मृत्यू प्रकरण मुंबई)

पायधूनीतील चौघांच्या मृत्यूप्रकरणी डोकाडीया कुटुंबीयांच्या शरीरातून तसेच जप्त करण्यात आलेल्या कलिंगडाच्या नमुन्यात झिंग फॉस्फाईड सापडल्याने मृत्यूचं कारण जरी हे विषारी रसायन असलं तरी त्याला डॉक्टरांच्या पुष्टीची आवश्यकता आहे. पोलीस एफसीएलचा अहवाल सर जेजे रुग्णालयाच्या तज्ञांना सोपवतील जे मृत्यूची अचूक कारणे आणि याप्रकरणी अद्याप अनुत्तरित असलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे देतील. जेजे रुग्णालयाचे न्यायवैद्यक शस्त्र विभागाचे तज्ञ तसेच इतर विभागातील तज्ञ डॉक्टरांचं पथक आता या अहवालाचा सखोल अभ्यास करणार आहे. यावेळी चौघांना झालेली विषबाधा, तीचं स्वरूप, विषबाधा झाल्यानंतर समोर आलेली लक्षणे त्यांची खालावलेली परिस्थिती तिचा वेग या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन त्यांच्या मृत्यूचं स्वरूप, मृत्यूचा प्रकार, मृत्यू होण्याची वैद्यकीय प्रक्रिया या चौघांना कोणते गंभीर आजार असल्यास या सगळ्यांची जोडणी करून जेजे रुग्णालयाच्या तज्ञ पथक तपास करणार आहे.

नेमकं प्रकरण काय? (Watermelon Death Mumbai Pydhonie Family)

डोकाडिया कुटुंबीयांनी 25 एप्रिल रोजी रात्री कलिंगड खाल्ले. कलिंगड खाल्ल्यानंतर चौघांनाही उलट्या, चक्कर आणि पोटदुखी यांसारखी लक्षणे जाणवू लागली. त्यानंतर 26 एप्रिलला त्यांची प्रकृती अधिकच खालावली. डोकाडिया यांच्या दोन्ही मुली बेशुद्धावस्थेत आढळल्या. यानंतर चौघांनाही तात्काळ जेजे रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात नेल्यानंतर एका मुलीला डॉक्टरांनी मृत घोषीत केले. त्यानंतर काही तासांनी दुसऱ्या मुलीचाही मृत्यू झाला. दुसऱ्या मुलीच्या मृत्यूनंतर काही वेळात पालकांचाही मृत्यू झाला. सदर घटनेमुळे विविध प्रश्न उपस्थित होत आहे.

संबंधित बातमी:

मोठी बातमी : डोकाडियांच्या घरात सापडलेलं औषध उंदीर मारण्याचं नव्हतंच, कलिंगड खाऊन मृत्यूप्रकरणात पुन्हा ट्विस्ट

आणखी वाचा

Comments are closed.