अशोक खरात प्रकरणात एसआयटीने चौकशीला बोलावलं, रुपाली चाकणकरांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या…
Rupali Chakankar SIT Inquiry Ashok Kharat Case: नाशिकमधील भोंदू अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) आज एसआयटीसमोर (SIT) हजर होणार आहेत. यासाठी त्या आज सकाळी पुण्याहून (Pune) नाशिककडे (Nashik) रवाना झाल्या आहेत. नाशिक येथील गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण महाविद्यालयात त्यांची चौकशी पार पडणार असल्याची माहिती मिळत आहे. या चौकशीसाठी एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते स्वतः उपस्थित राहून रुपाली चाकणकर यांना प्रश्न विचारण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, चौकशीदरम्यान रुपाली चाकणकर यांच्यासोबत त्यांचे वकीलही उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे. आता या प्रकरणावर रुपाली चाकणकर यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
Rupali Chakankar SIT Inquiry Ashok Kharat Case: नेमकं काय म्हणाल्या रुपाली चाकणकर?
एसआयटी चौकशीआधी रूपाली चाकणकर यांनी नाशिक येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, एसआटीचा जो तपास सुरू आहे, त्या संदर्भात त्यांचे काही प्रश्न असतील आणि त्यांना काही उत्तर हवे असतील तर ते देण्यासाठी मी आज आलेली आहे. त्यांना तपासात माझे पूर्णपणे सहकार्य राहील. तपासाला सामोरे जात असताना जी जी मदत पोलिसांना आणि तपास अधिकाऱ्यांना हवी असेल त्याला मी सहकार्य करेल. तपास पूर्ण झाल्यावर तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील, अशी प्रतिक्रिया रुपाली चाकणकर यांनी दिलीय. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. कोण काय बोलतंय याची मला कल्पना नाही. दरम्यान, समता पतसंस्था आणि जगदंबा पतसंस्थेत असलेल्या अशोक खरातच्या बँक खात्यांशी चाकणकरांचा संबंध काय? याबाबत विचारले असता रूपाली चाकणकर म्हणाल्या की, यात जी खाती होती ती सर्व बनावट खाती आहेत. त्याचा अहवाल समोर येईल, असे त्यांनी म्हटले आहे.
Anjali Damania on Rupali Chakankar: वकिलांना बाहेर ठेवा अन् चाकणकरांची चौकशी करा : दमानिया
दरम्यान, रुपाली चाकणकर यांच्या एसआयटी चौकशीच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एसआयटीकडे मोठी मागणी केलीय. अंजली दमानिया म्हणाल्या की, गेले दोन महिने मी खरात प्रकरण बघत आहे. यातले अनेक खुलासे लोकांसमोर येत नाही. जी माहिती मला मिळाली. ती मी एसआयटीच्या सातपुते मॅडम यांना माहिती दिली. तेव्हा 9 महिल्यांच्या तक्रारी आलेल्या आहेत. एसपींकडे जगदंबा पतसंस्थेची चौकशी सुरु आहे. यात डीजींना मी पत्र लिहून विचारणा केली होती की, इतर राजकीय नेत्यांची कधी चौकशी करणार? सुनील तटकरे, रुपाली चाकणकर आणि इतरांची चौकशी झाली पाहिजे. आज रुपाली चाकणकर चौकशीला जात आहेत. आज त्या जात असताना गाड्या बदलत आहेत. वकिलांना घेऊन गेल्या आहेत. एसआयटीने त्या वकिलांना बाहेर ठेवले पाहिजे आणि चौकशी केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केलीय.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.