मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच विजय थलपती यांचे 3 धडाकेबाज निर्णय; फाईल्सवर पटापट सह्या

Vijay Thalapathy Tamil Nadu Politics: अभिनेता जोसेफ विजय (Vijay Thalapathy) यांनी आज तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. अखेर पाच दिवसांच्या नाट्यमय घडामोडींनंतर (Tamil Nadu Politics) आज तमिळनाडूत शपथविधी सोहळा पार पडला. राज्यपाल विश्वनाथ अर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी 9 मंत्र्यांचाही शपथविधी पार पडला. या शपथविधी सोहळ्यासाठी राहुल गांधींची उपस्थिती होती.

चेन्नई येथील नेहरू इनडोअर स्टेडियममध्ये शपथविधी पार पडल्यानंतर लगेचच, विजय यांनी तीन महत्त्वाच्या फाईल्सवर स्वाक्षरी केली. या स्वाक्षऱ्यांद्वारे, घरगुती ग्राहकांना 200 युनिट्सपर्यंत मोफत वीज पुरवण्यास आणि महिलांच्या सुरक्षेसाठी समर्पित एका विशेष दलाची स्थापना करण्यास विजय यांनी मंजुरी दिली. (Vijay Thalapathy Tamil Nadu Politics)

तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून विजय यांचे पहिले तीन आदेश- (Vijay Thalapathy Tamil Nadu Politics)

    1. दरमहा 200 युनिट्स मोफत वीज
    2. प्रत्येक जिल्ह्यात अंमली पदार्थविरोधी पथकाची स्थापना
    3. महिला सुरक्षा दलाची स्थापना

आमदारांची जुळवाजुळव करण्यासाठी टीव्हीकेला लागले 3 दिवस- (Vijay Thalapathy Tamil Nadu Politics)

जोसेफ विजयने सीएमओ कार्यालयात जाऊन पदभारही स्वीकारला  तामिळनाडूत विजय यांच्या टीव्हीके पक्षाला तब्बल 107 जागा मिळाल्या. मात्र, सत्तास्थापनेसाठी आणखी 11 आमदारांची जुळवाजुळव करण्यात त्यांच्या नाकीनऊ आले होते. सुरुवातीलाच काँग्रेसच्या 5 आमदारांनी टीव्हीकेला पाठिंबा दिला. मात्र आणखी 6 आमदारांची जुळवाजुळव करण्यासाठी टीव्हीकेला 3 दिवस लागले.

सत्तास्थापनेचा तिडा कसा सुटला? (Vijay Thalapathy Tamil Nadu Politics)

काल संध्याकाळपर्यंत त्यांच्या आमदारांची संख्या 116 पर्यंत पोहोचली. तरीही दोन आमदारांचं संख्याबळ कमी असल्यानं सत्तास्थापनेचा पेच सुटला नव्हता. अखेर व्हीसीकेच्या दोन आणि इंडियन युनियन मुस्लीम लीगच्या दोघांनी टीव्हीकेला पाठिंबा दिल्याने टीव्हीकेचं संख्याबळ 120 वर पोहोचलं आणि  सत्तास्थापनेचा तिढा सुटला.

कोण आहेत विजय थलपती? (Who Is Vijay Thalapathy)

विजय थलपती उर्फ जोसेफ विजय यांचा जन्म 22 जून 1974 रोजी झाला. विजय यांनी तमिळ चित्रपटसृष्टीत बालकलाकार म्हणून सुरुवात केली आणि पुढे आघाडीचे सुपरस्टार अभिनेता म्हणून मोठे नाव कमावले. विजय यांच्या अभिनयामुळे आणि जनसामान्यांमध्ये असलेल्या लोकप्रियतेमुळे त्यांना “थलपती” म्हणून ओळखले जाते. अनेक यशस्वी चित्रपटांमधून त्यांनी सामाजिक संदेश देण्याचाही प्रयत्न केला. पुढे विजय यांनी राजकारणात प्रवेश करत Tamilaga Vettri Kazhagam या पक्षाची स्थापना केली. जनतेसाठी शिक्षण, रोजगार आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासन यांसारख्या मुद्द्यांवर त्यांनी भर दिला. अभिनेता ते राजकीय नेता असा त्यांचा प्रवास तमिळनाडूमधील तरुणांसाठी प्रेरणादायी मानला जातो.

तामिळनाडूतील पक्षीय बलाबल – एकूण 234 (Tamilnadu Election Result 2026)

TVK (विजय) – 108
द्रमुक – 59
AIADMK – 47
काँग्रेस – 5
पीएमके – 4
मुस्लिम लीग – २
कम्युनिस्ट पक्ष – २
अंतिम फेरी – २
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष – २

संबंधित बातमी:

Joseph Vijay And Trisha Krishnan: विजय थलपती यांच्या शपथविधी सोहळ्याला रुमर्ड गर्लफ्रेंड तृषाची एन्ट्री होताच काय घडलं?, सगळ्याचं लक्ष वेधलं, PHOTO

आणखी वाचा

Comments are closed.