खसादार श्रीकांत शिंदेंचा महाराष्ट्र दौरा जाहीर, 22 जिल्ह्यातील 70 विधानसभा मतदारसंघात जाणार
श्रीकांत शिंदे: शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे हे येत्या 16 मे पासून महाराष्ट्रातील 22 जिल्हे आणि 65 ते 70 विधानसभा मतदार संघाचा दौरा करणार आहेत. त्यांचा हा दोन महिन्यांचा दौरा असणार आहे. तर 15 जुलै रोजी त्यांचा हा दौरा संपणार आहे. या दौऱ्यात खासदार श्रीकांत शिंदे थेट कार्यकर्त्यांनी संवाद साधणार आहेत. तसेच SIR मोहिमेअंतर्गत शिवसेना BLA 1 BLA 2 यांच्या नेमणुकांचा आढावा या दौऱ्यात घेतला जाणार आहे.
पहिल्या टप्यात नाशिक, धुळे, आहिल्यानगर, बीड, अमरावती, अकोल्याचा दौरा होणार
तीन टप्यात हा दौरा होणार असून पहिल्या टप्यात नाशिकधुळे, आहिल्यानगर, बीडअमरावती, अकोला हा दौरा असणार आहे. दुसऱ्या टप्यात जळगावनंदुरबार, यवतमाळ, वाशिम, नांदेड, हिंगोली, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली सा दौरा असणार आहे. तर तिसऱ्या टप्यात बुलढाणा, जालना, नागपूरभंडारा, गोंदिया, ठाणे आणि पालघर असा हा दौरा असणार आहे.
निवडणुकीच्या अनुषंगाने संघटन बांधण्यासाठी हा दौरा महत्वाचा
30 मार्च रोजी महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदार संघात नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. खासदार श्रीकांत शिंदे यांनी महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात दौरा केला आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी 65 ते 70 ठिकाणी दौरे केले आहेत. एकनाथ शिंदे यांनी 22 जिल्ह्यात असलेल्या 11 मंत्र्यांना संपर्क प्रमुख म्हणून दोन जिल्हे दिले आहेत. ताकद वाढवण्याचं काम केल्याची माहिती शिवसेना शिंदे गटाचे नेते सचिन भाऊसाहेब चौधरी यांनी दिली. आता श्रीकांत शिंदे यांचा 22 जिल्ह्याचा दौरा 16 मे ते 15 जुलै दरम्यान करण्यात येणार आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने संघटन बांधण्यासाठी हा दौरा होणार आहे. यापूर्वी ज्या लोकांना पद दिली त्याचं कामच मूल्यमापन केलं जाईल. उत्तर महाराष्ट्रातून हा दौरा सुरू होणार असल्याची माहिती सचिन चौधरी यांनी दिली. या दौऱ्याच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांना संघटनात्मक ताकद देण्याचं काम करण्यात येणार आहे. हा दौरा संघटनेच्या दृष्टीने महत्वाचा असणार आहे.
दरम्यान, श्रीकांत शिंदे हे तीन टप्प्यात महाराष्ट्र दौरा करणार आहेत. त्यांच्या दौऱ्यामुळं शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना मोठं बळ मिळणार आहे. विशेष म्हणजे ते थेट कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. आगामी काळात पक्षाची ताकद वाढवण्यासाठी शिवसेने आणि श्रीकांत शिंदे यांनी उचललेलं मोठं पाऊल आहे.
महत्वाच्या बातम्या:
Solapur Shivsena :आढावा बैठकीदरम्यान श्रीकांत शिंदेंसमोरच पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक, दौरा संपताच अख्खी कार्यकारिणीच बरखास्त; सोलापुरात मोठी उलथापालथ
आणखी वाचा
Comments are closed.