जमिनीचा वाद अन् घरातील व्यक्तींनीच केला घात; वडील, सावत्र आई अन् सावत्र भावाने तरूणाला संपवलं,

पुणे : बारामती तालुक्यातील जोगवडी परिसरात जमिनीच्या वाटपाच्या वादातून एका तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी मृत तरुणाच्या वडीलांसह सावत्र आई आणि सावत्र भावाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. सूरज संजय गुरुमकर असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. परवा रात्री त्यांचा मृतदेह घराशेजारील परिसरात आढळून आला. डोक्यावर गंभीर वार झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.(Pune Crime News)

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुमकर कुटुंबामध्ये गेल्या काही दिवसांपासून जमिनीच्या वाटपावरून वाद सुरू होता. याच वादातून सूरज यांची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच वडगाव निंबाळकर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी मृताचे वडील संजय गुरुमकर, सावत्र आई माया गुरुमकर आणि सावत्र भाऊ अर्थव गुरुमकर यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून संबंधितांची चौकशी सुरू असून पुढील तपास करण्यात येत आहे.(Pune Crime News)

Pune Crime News:  नेमकं काय घडलं?

बारामती तालुक्यातील जोगवडी परिसरात जमिनीच्या वाटपाच्या वादातून एका तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलिसांनी मृत तरुणाच्या वडील, सावत्र आई आणि सावत्र भावाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. हत्या झालेल्या तरुणाचे नाव सूरज संजय गुरुमकर असे आहे. त्यांचा मृतदेह परवा रात्री घराशेजारील परिसरात आढळून आला. डोक्यात वार करून त्यांची हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पूर्वीपासून सुरू असलेल्या जमिनीच्या वाटपाच्या वादातून हा खून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. वडगाव निंबाळकर पोलिसांनी मृताचे वडील संजय गुरुमकर, सावत्र आई माया गुरुमकर आणि सावत्र भाऊ अर्थव गुरुमकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करीत आहेत.(Pune Crime News)

Pune Crime News:  मारतीच्या आठव्या मजल्यावरून पडून एका 34 वर्षाच्या विवाहितेचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील तळेगाव एमआयडीसी परिसरामध्ये एक अत्यंत दुर्देवी घटना घडली आहे. एका उच्चभ्रू इमारतीच्या आठव्या मजल्यावरून पडून एका 34 वर्षाच्या विवाहितेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विवाहित महिला इमारतीच्या आठव्या वरून पडत असतानाची दृश्य मोबाईल कॅमेरा मध्ये कैद झाली आहेत. तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील काकडे वीटीपीआर अर्बन लाइफ सोसायटीमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे या दुर्दैवी घटनेत प्रतिभा मनीष शंकर व 34 वर्ष या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. काल दुपारी दीड वाजता दरम्यान ही धक्कादायक घटना घडली आहे. प्रतिभा मनीष शंकर या महिलेने घरगुती वादातून आत्महत्या केली का ? तिचा अपघाताने खाली पडून मृत्यू झाला ?  या विषयाचा तपास आता तळेगाव एमआयडीसी पोलीस करत आहेत. मात्र सध्या तिच्या मृत्यू प्रकरणात तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास तळेगाव एमआयडीसी पोलीस करत आहेत.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.