लग्नसोहळ्यानंतर वादाचे हिंसक रूप; मारहाणीचा लाईव्ह व्हिडिओ व्हायरल, दोन्ही गटांकडून गुन्हे दाखल
वसई-विरार क्राईम न्यूज वसई : वसईतील एका विवाहसोहळ्यानंतर निर्माण झालेल्या वादाने गंभीर वळण घेतले असून, मारहाणीचा लाईव्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने या प्रकरणाची मोठी चर्चा सुरू झाली आहे. या घटनेप्रकरणी नवरदेव आणि वधू या दोन्ही गटांकडून माणिकपूर पोलीस ठाण्यात (Manikpur Police Station) परस्परांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नवरदेवाच्या गटाकडून मारहाणीची (Vasai Crime News) तक्रार, तर वधूच्या गटाकडून पॉक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही प्रकरणांत काही आरोपींना ताब्यात देखील घेण्यात आले असल्याची माहिती आहे.
Vasai Crime : माणिकपूर पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या तक्रारींची नोंद, आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी सुरू
मिळालेल्या माहितीनुसार, विवाहसोहळा पार पडल्यानंतर काही कारणावरून दोन्ही गटांमध्ये वाद निर्माण झाला. सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाली, मात्र काही वेळातच वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या मारहाणीत काही जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, संपूर्ण प्रकाराचा लाईव्ह व्हिडिओ व्हायरल झाल्याने घटनेची गंभीरता अधिक अधोरेखित झाली आहे. या संवेदनशील प्रकरणात माणिकपूर पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या तक्रारींची नोंद घेऊन तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहे. या प्रकरणी काही आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. आता या व्हायरल व्हिडिओसह उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
Accident News : माजलगाव – तालखेड फाट्यावर डिझेलच्या टँकरला अपघात, सांडलेल्या इंधनासाठी नागरिकांची झुंबड
माजलगाव तालुक्यातील तालखेड फाट्याजवळ डिझेलने भरलेला टँकर अचानक पलटी झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. अपघातानंतर मोठ्या प्रमाणात डिझेल रस्त्यावर सांडले. घटनेची माहिती मिळताच आसपासच्या गावांतील नागरिकांनी हांडे, कॅन व भांडी घेऊन घटनास्थळी धाव घेत सांडलेले डिझेल गोळा करण्यासाठी झुंबड उडवली. या अपघातामुळे काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाला. माहिती मिळताच पोलिस व संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे काम सुरू आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.