ऑस्ट्रेलियन क्रिकेट पाकिस्तानच्या वाटेवर; सेंट्रल कॉन्ट्रॅक्टवरून खेळाडू आणि बोर्डात जुंपली, 5 सीनियर खेळाडूंचे बंड

ऑस्ट्रेलियन क्रिकेट सध्या मोठ्या बदलातून जात असून यामुळे अंतर्गत वादाची ठिणगी पडली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बिग बॅश लीगचे खासगीकरण करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तो सध्या तरी यशस्वी झाला नाही. मात्र, तेव्हापासून बोर्डातील असंतोष वाढतच चालला आहे. आता हा वाद केवळ बीबीएलपुरता मर्यादित नसून सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट, खेळाडूंचे समाधान आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या भविष्यावरही त्याचे सावट दिसू लागले आहे.

‘कोड स्पोर्ट्स’च्या वृत्तानुसार, ऑस्ट्रेलियाच्या किमान पाच वरिष्ठ खेळाडूंनी अद्याप त्यांच्या नवीन सेंट्रल कॉन्ट्रॅक्टवर स्वाक्षरी केलेली नाही. याचे मुख्य कारण म्हणजे करारात मिळणारी रक्कम आणि परदेशी टी-20 लीगमध्ये खेळण्यासाठी मिळणारी मर्यादित संधी. खेळाडूंची मागणी आहे की त्यांना परदेशी लीगमध्ये खेळण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र सहज मिळावे.

काही वर्षांपूर्वीपर्यंत ऑस्ट्रेलियन खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सर्वोच्च प्राधान्य देत असत. मात्र, आता IPL, SA20 आणि ILT20 सारख्या लीग खेळाडूंना करोडो रुपये देऊ करत आहेत. त्यामुळे अनेक खेळाडू आता आपल्या करिअर आणि कमाईसाठी नवीन रणनीती आखत आहेत.

दरम्यान, कसोटी आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला 3 वर्षांसाठी सुमारे 10 दशलक्ष डॉलर्सचा (जवळपास 100 कोटींहून अधिक रुपये) मोठा कॉन्ट्रॅक्ट दिला जाणार आहे. कमिन्स हा जगातील मोठा स्टार असला तरी या बातमीमुळे इतर खेळाडूंमध्ये नाराजी पसरली आहे. अनेक खेळाडूंना वाटते की त्यांची सॅलरी फ्रेंचायजी क्रिकेटच्या तुलनेत आता खूपच मागे पडली आहे.

IPL 2026 – क्रिकेट नाही हा तर तमाशा आहे, हर्ष गोयंका यांनी उपस्थित केले आयपीएलवर प्रश्न

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये बीबीएलमधील 12 प्रमुख खेळाडूंनी एक व्हॉट्सॲप ग्रुप तयार केला होता. यामध्ये लीगच्या पगारातील असमानतेवर चर्चा झाली. खेळाडूंची तक्रार आहे की अनेकदा परदेशी खेळाडू मोठे स्टार नसले तरीही स्थानिक ऑस्ट्रेलियन खेळाडूंपेक्षा जास्त पैसे दिले जातात. इतर जागतिक टी-20 लीगशी स्पर्धा, व्यस्त आंतरराष्ट्रीय वेळापत्रक, मोठ्या स्टार खेळाडूंची अनुपस्थिती यामुळे बिग बॅश लीग आधीच अनेक आव्हानांचा सामना करत आहे. त्यात आता खेळाडूंचेही गट पडत असल्याने ऑस्ट्रेलियन क्रिकेटपुढे आव्हानांचा डोंगर उभा राहिला आहे.

IPL 2026 – पुढे धोका आहे… बीसीसीआयने आयपीएलच्या संघांना दिली ताकीद

Comments are closed.