6,6,6,6,6,4,6… उर्विल पटेलने ठोकले IPL इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतक, सेलीब्रेशन करताना खि
उर्विल पटेल सर्वात जलद अर्धशतक IPL बातम्या : एम.ए. चिदंबरम स्टेडियम (चेपॉक) वर रविवारी आयपीएल 2026 मधील असा एक सामना पाहायला मिळाला, जो क्रिकेट इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला. लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सच्या उर्विल पटेलने तांडव घातला आणि अवघ्या 13 चेंडूत अर्धशतक झळकावत आयपीएल इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतकाच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.
अन खरे पटेल! 🤯
संयुक्त-जलद 5️⃣0️⃣ इंच #TATAIPL इतिहास फक्त 1️⃣3️⃣ चेंडूत 👏👏
अपडेट्स ▶️ https://t.co/MoXhlWHk4O#TATAIPL | #खेलबिंदास | #CSKvLSG | @ChennaiIPL pic.twitter.com/nfNE6LcNL6
— इंडियन प्रीमियर लीग (@IPL) 10 मे 2026
मैदानावर उर्विल पटेल नावाचं वादळ
204 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईची सुरुवात आक्रमक झाली. संजू सॅमसनने 14 चेंडूत 28 धावा केल्या, पण तो बाद झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या उर्विल पटेलने खेळाचे चित्रच पालटून टाकले. उर्विल डगआऊटमधूनच सेट होऊन आल्यासारखा खेळत होता. त्याने मैदानात पाऊल ठेवताच फटकेबाजी सुरू केली. उर्विलच्या या खेळीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याने सलग 7 चेंडूंवर 6 षटकार आणि 1 चौकार ठोकून स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या प्रेक्षकांना वेडे करून सोडले. लखनऊच्या गोलंदाजांकडे त्याच्या या आक्रमणाचे कोणतेही उत्तर नव्हते.
6️⃣6️⃣6️⃣6️⃣6️⃣4️⃣6️⃣❗🔥
उर्विल पटेल चेपॉक येथे संपूर्ण नरसंहार घडवून आणत आहे! 💥🏏
तो सर्वात वेगवान अर्धशतक स्क्रिप्ट करेल का? #TATAIPL? 👀🔥#TATAIPL रिव्हेंज वीक २०२६ ➡️ #CSKvLSG | आता थेट 👉 https://t.co/niGR0vFDDY pic.twitter.com/86xCo1SXsh
— स्टार स्पोर्ट्स (@StarSportsIndia) 10 मे 2026
सेलीब्रेशन करताना खिशातून काढली चिठ्ठी अन्…
अर्धशतक पूर्ण केल्यानंतर उर्विलने अत्यंत भावनिक पद्धतीने सेलिब्रेशन केले. त्याने आपली बॅट आकाशाकडे उंचावली आणि खिशातून एक चिठ्ठी काढली आहे, ज्यामध्ये लिहिले की, ‘पप्पा, हे फक्त तुमच्यासाठी…’ त्याने हे यश आपल्या वडिलांना समर्पित केले. उर्विलच्या या यशामागे त्याच्या वडिलांचे मोठे कष्ट आहेत, आणि एका जागतिक मंचावर अशा प्रकारे चमकणे हा त्यांच्यासाठी खरोखरच अभिमानास्पद क्षण ठरला.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.