धक्कादायक… प्रेमसंबंधात अडसर ठरला पती; पत्नीने विजेचा शॉक देऊन जीव घेण्याचा केला प्रयत्न

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

कळंब तालुक्यातील पंगडी येथे प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्याच्या रागातून पत्नीने पतीला विजेचा शॉक देऊन ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पत्नी व तिच्या कथित प्रियकराविरुद्ध वडगाव जंगल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी गजानन मोरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ३ मे रोजी मध्यरात्री ते घरात झोपलेले असताना पत्नी कवडी मोरे हिने विद्युत वायरला अॅल्युमिनियम तार जोडून त्यांना विजेचा शॉक देण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुदैवाने गजानन मोरे हे यातून बचावले. या कटामागे तिचा कथित प्रियकर विष्णू आत्राम याचा सहभाग असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, पोलिसांनी कवडी मोरे व विष्णू आत्राम यांच्याविरुद्ध बीएनएस कलम १०९(१), ६१(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना अटक करण्यात आली आहे.

“आरोपी ग्रामपंचायत सदस्य आहे. यापूर्वी त्याच्यावर अवैध दारू विक्रीप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.” — विकास दंडे, पोलीस निरीक्षक, वडगाव जंगल.

Comments are closed.