नाशिक TCS प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाचा धक्कादायक अहवाल समोर, अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर

नाशिक टीसीएस प्रकरणाच्या बातम्या : नाशिकमधील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) बीपीओ युनिटमधील कर्मचाऱ्यांच्या लैंगिक शोषण आणि जबरदस्तीने धर्मांतर प्रकरणावरून मोठी खळबळ उडाली आहे. हे प्रकरण महिला कर्मचाऱ्यांच्या मानसिक आणि शारीरिक छळाशी संबंधित आहे. या प्रकरणासंदर्भात महत्वाची अपडेट आली आहे. नाशिक टीसीएस प्रकरणावर राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) चा धक्कादायक अहवाल समोर आला आहे. नाशिक प्रकरणाची दखल घेत 50 पानांहून अधिकचा अहवाल महाराष्ट्रमुख्यमंत्र्यांना त्रास होतो देवेंद्र फडणवीस यांना सादर केला आहे.

आरोपींकडून महिला कर्मचाऱ्यांचा लैंगिक, मानसिक आणि भावनिक छळ झाल्याचा निष्कर्ष

अहवालात कार्यस्थळी लैंगिक छळ, मानसिक अत्याचार, धार्मिक भावना दुखावणे आणि POSH कायद्याच्या शून्य अंमलबजावणीचे गंभीर आरोप नोंदवले आहेत. आरोपींकडून महिला कर्मचाऱ्यांचा लैंगिक, मानसिक आणि भावनिक छळ झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. हिंदू धर्म, परंपरा आणि श्रद्धांचा अपमान करुन महिलांवर दबाव टाकल्याचा आरोप करण्यात करण्यात आला आहे.

CCTV बसवलेले असले तरी ते बंद अवस्थेत असल्याचं आयोगाच्या निदर्शनात दिसून आलं

महिला कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण, तक्रार केल्यास बदली आणि नोकरी गमावण्याची भीती दाखवल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे. POSH समिती पूर्णपणे निष्क्रिय असून नाशिक कार्यालयात कोणतीही जागरूकता व्यवस्था नव्हती. CCTV बसवलेले असले तरी ते बंद अवस्थेत असल्याचं आयोगाच्या निदर्शनात दिसून आलं आहे. NCW ने पोलिसांना Witness Protection Act अंतर्गत तक्रारदारांना संरक्षण देण्याचे निर्देश दिले आहेत. आयोगाने संबंधित आरोपींवर BNS कलम 75, 78, 79 आणि 299 अंतर्गत कारवाईची शिफारस केली असून टीसीएस व्यवस्थापनावरही कठोर प्रश्न उपस्थित केले आहेत.

नेमकं प्रकरण काय?

नाशिकमधील टीसीएस (टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस) कंपनीत महिला कर्मचाऱ्यांना धमकावून त्यांचं लैंगिक शोषण आणि मानसिक छळ केल्याचे आरोप याच कंपनीतील 8 महिलांनी केले आहेत. या प्रकरणामध्ये आतापर्यंत 9 एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत. पीडित महिलांनी या एफआयआरमध्ये अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. या कंपनीत काम करणारे कर्मचारी, एचआर विभागातील कर्मचारी आणि डिलिव्हरी पार्टनर अशा आरोपींच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.बळजबरी, लैंगिक शोषण, लग्नाचे आमीष दाखवून फसवणूक, धार्मिक भावना दुखावणे अशा प्रकारचे अनेक आरोप पीडित महिलांनी केले आहेत. या प्रकरणात आतापर्यंत दोन महिलांसह एकूण 8 जणांवर कारवाई करण्यात अटक करण्यात आली आहे. कंपनीतील ज्या कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे, त्यांचं कंपनीनं निलंबन केलं गेलंय. तसंच, एका निवेदनाद्वारे कंपनीनं स्पष्टीकरण देत तपासात सहकार्य करत असल्याचं सांगितलंय. तर डिलिव्हरी पार्टनर असलेल्या आरोपी महिलेच्या वकिलांनीही आरोप फेटाळून लावले आहेत.

महत्वाच्या बातम्या:

Nashik TCS Case Nida Khan Arrested: टीसीएस धर्मांतर प्रकरणाची सूत्रधार निदा खानला लपवून ठेवणारा एमआयएमचा ‘तो’ नगरसेवक कोण?

आणखी वाचा

Comments are closed.