IPL 2026 मध्ये चौकारांचा पाऊस! टॉप-10 फलंदाजांच्या यादीत फक्त एकच विदेशी खेळाडू; पाहा कोण आहे नंबर-1…
आयपीएल 2026 मध्ये आतापर्यंत 55 सामने खेळले गेले आहेत, लीग टप्प्यातील 15 सामने अजून बाकी आहेत. सध्या, या हंगामात सर्वाधिक चौकार मारणारा फलंदाज केएल राहुल आहे, ज्याने चौकारांचे अर्धशतक पूर्ण केले आहे. दुसऱ्या क्रमांकावर संजू सॅमसन आहे, तर शुभमन गिल तिसऱ्या स्थानावर आहे. अभिषेक शर्मा आणि विराट कोहली यांचा समावेश असलेल्या या ‘टॉप 10’ यादीत नऊ भारतीय फलंदाज आणि केवळ एका परदेशी खेळाडूचा समावेश आहे. कोण कोणत्या स्थानावर आहे आणि प्रत्येक खेळाडूने किती चौकार मारले आहेत, ते पाहुया..
1. केएल राहुल -दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणारा केएल राहुल सध्या या हंगामात सर्वाधिक चौकार मारणारा फलंदाज आहे. त्याने 12 डावांमध्ये एकूण 477 धावा केल्या असून 50 चौकार मारले आहेत.
2. संजू सॅमसन – संजू सॅमसन दुसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्यांदाच चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना, संजूने 11 डावांमध्ये 430 धावा केल्या असून 45 चौकार मारले आहेत.
3. शुभमन गिल – गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 10 डावांमध्ये 44 चौकार मारले आहेत. आतापर्यंत त्याने चार अर्धशतकी खेळी खेळल्या असून एकूण 462 धावा केल्या आहेत.
4. साई सुदर्शन- शुभमन गिलसोबत डावाची सुरुवात करणाऱ्या साई सुदर्शनने 11 डावांमध्ये 44 चौकार मारले आहेत. ही संख्या गिलच्या चौकारांच्या संख्येइतकीच आहे. स्पर्धेच्या या चालू हंगामात, त्याने आतापर्यंत एक शतक आणि चार अर्धशतके झळकावली आहेत.
5. अभिषेक शर्मा- सनरायझर्स हैदराबादचा सलामीवीर आणि जगातील टी-20 मधील अव्वल क्रमांकाचा फलंदाज, अभिषेक शर्मा, या यादीत पाचव्या स्थानावर आहे. अभिषेकने 11 डावांमध्ये 43 चौकार मारले आहेत. या हंगामात आतापर्यंत त्याने एक शतक आणि तीन अर्धशतके झळकावली आहेत.
6. प्रभसिमरन सिंग- पंजाब किंग्सचा सलामीवीर प्रभसिमरन सिंग सहाव्या क्रमांकावर आहे; त्याने 1 0डावांमध्ये 42 चौकार मारले आहेत. या हंगामात त्याने 4 अर्धशतके झळकावली आहेत.
7. विराट कोहली – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB) स्टार फलंदाज विराट कोहली या यादीत सातव्या क्रमांकावर आहे. या हंगामात आतापर्यंत, RCB कडून सर्वाधिक चौकार मारणारा फलंदाज तोच ठरला आहे; त्याने 11 डावांमध्ये एकूण 42 चौकार ठोकले आहेत. कोहलीने 3 अर्धशतके झळकावली आहेत.
8. ईशान किशन – सनरायझर्स हैदराबादकडून खेळणाऱ्या ईशान किशनने 11 डावांमध्ये 41 चौकार मारले आहेत. या सुरू असलेल्या हंगामात त्याने 4 अर्धशतके नोंदवली आहेत.
9. वैभव सूर्यवंशी – राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर वैभव सूर्यवंशी हा आपल्या संघाकडून सर्वाधिक चौकार मारणारा फलंदाज असून, या यादीत तो नवव्या स्थानावर आहे. त्याने 11 डावांमध्ये 38 चौकार मारले आहेत. विशेष म्हणजे, त्याच्या षटकारांची संख्या त्याच्या चौकारांच्या संख्येपेक्षा जास्त आहे; त्याने आतापर्यंत 40 षटकार ठोकले आहेत.
10. ट्रॅव्हिस हेड- ट्रॅव्हिस हेड हा अव्वल 10 खेळाडूंमध्ये स्थान मिळवणारा एकमेव परदेशी खेळाडू असून, या यादीत तो दहाव्या क्रमांकावर आहे. हेडने 11 डावांमध्ये 38 चौकार मारले आहेत.
Comments are closed.