भोंदू खरातला श्रद्धेपोटी गुरू मानले; त्याच्याशी आर्थिक संबंध नाहीत एसआयटी चौकशीत चाकणकरांचा खुलासा
आमचे कुटुंब वारकरी संप्रदायाचे आहे, भोंदू अशोक खरात याला केवळ आध्यात्मिक श्रद्धेमुळे गुरू मानले होते, खरातशी कुठलेही आर्थिक संबंध नाहीत, असा खुलासा राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी एसआयटी चौकशीत केला.
खरातच्या आर्थिक व्यवहारांशी संबंध आहे का, यासह अन्य बाबींची चौकशी करण्यासाठी एसआयटीने रूपाली चाकणकर यांची रविवारी तब्बल सहा तास चौकशी केली. ‘एसआयटीच्या सर्व प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली, तपास पूर्ण झाल्यानंतर सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील,’ असे चाकणकर यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.
Comments are closed.