माझा मुलगा निर्दोष, तो सहा महिन्यांपासून…; NEET पेपरफुटी प्रकरण, आरोपी शुभमच्या वडिलांची पहिल

नाशिक NEET पेपर लीक: देशभरात गाजत असलेल्या नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणात नाशिकमधून (Nashik) 30 वर्षीय शुभम खैरनारला (Shubham Khairnar) ताब्यात घेतल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात शुभमवर गंभीर आरोप ठेवण्यात आले असतानाच, आता त्याचे वडील डॉ. मधुकर खैरनार यांनी आपल्या मुलाची बाजू मांडली असून, तो निर्दोष असल्याचा दावा केला आहे.

Nashik NEET Paper Leak: शुभम खैरनारच्या वडिलांची प्रतिक्रिया

या प्रकरणावर बोलताना शुभमचे वडील डॉ. मधुकर खैरनार म्हणाले की, “आमचा मुलगा निर्दोष आहे.. गेल्या सहा महिन्यापासून तो नाशिकमध्ये BAMS ची प्रॅक्टीस करतो आहे. त्याचा या प्रकरणाशी संबंध नसणार आहे. जरी त्याचे या प्रकरणात नाव येत असेल तर त्याची चौकशी व्हावी,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलीय.

Nashik NEET Paper Leak: 15 लाखांना प्रश्नपत्रिका विकल्याचा संशय

दरम्यान, राजस्थान सीबीआय आणि पोलिसांनी दिलेल्या गोपनीय माहितीच्या आधारे नाशिक गुन्हे शाखा युनिट 2 ने ही कारवाई केली. शुभम खैरनार हा मूळचा नांदगावचा रहिवासी असून तो नाशिकमध्ये बी.ए.एम.एस. (BAMS) च्या शेवटच्या वर्षात शिकत होता. तपासादरम्यान पोलिसांना त्याचे नाव मिळाले होते, मात्र पत्ता नव्हता. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याचा मागोवा घेतला. पोलिसांपासून वाचण्यासाठी शुभमने चक्क आपले संपूर्ण केस कापून टक्कल केले होते आणि कपडेही बदलले होते. मंगळवारी तो देवदर्शनासाठी जात असताना पोलिसांनी रस्त्यातच सापळा रचला. सुरुवातीला नवीन ‘लूक’मुळे तो ओळखू आला नाही, मात्र पोलीस अंमलदारांनी त्याला शिताफीने ओळखले आणि अवघ्या एक तासात त्याला ताब्यात घेतले. तीन मे रोजी झालेला नीटचा पेपर 1 मे रोजीच हा पेपर फुटला होता. शुभम खैरनारने 10 लाख रुपयांना ही प्रश्नपत्रिका विकत घेतली आणि ती पुढे 15 लाख रुपयांना विकल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे. या व्यवहारानंतर ही प्रश्नपत्रिका इन्स्टाग्रामवर लीक झाली आहे.

Nashik Neet Paper Leak: पहिली कॉपी नाशिकमध्ये लीक

नीट परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेची पहिली कॉपी नाशिकमध्ये लीक झाली, तिथून ती हरियाणात पोहोचली. हरियाणात या पेपरचे 10 संच तयार करण्यात आले आणि त्यानंतर बिहार, आंध्र प्रदेश, जम्मू-काश्मीरपर्यंत ही साखळी पसरली. या प्रकरणात आतापर्यंत देशभरातून 16 जणांना ताब्यात घेण्यात आले असून राजस्थानचा मनीष हा या कटाचा मुख्य सूत्रधार असल्याचे मानले जात आहे. तर पेपर फुटीप्रकरणामुळे यंदा 3 मे रोजी घेण्यात आलेली परीक्षा रद्द करण्यात आली आहे. नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे. विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र तेच राहणार असून त्यांना नवीन हॉल तिकीट दिले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

आणखी वाचा

Nashik Neet Paper Leak: NEET चा पेपर 15 लाखांना विकणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ‘असं’ केलं जेरबंद; हेअरस्टाईल बदलली तरी ‘बाझ’ नजरेनं हेरलं

शैक्षणिक कर्ज माहिती:
शैक्षणिक कर्ज EMI ची गणना करा

आणखी वाचा

Comments are closed.