सुरुवातीलाच विरोधकांचा गेम संपवला! IPL च्या इतिहासात पहिल्या ओव्हरमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या
आयपीएलमधील पहिल्या षटकात संघाद्वारे सर्वाधिक धावा: आयपीएलमध्ये आता नवा ट्रेंड पाहायला मिळतोय. फलंदाज पहिल्याच चेंडूपासून चौकार-षटकारांचा पाऊस पाडण्याच्या इराद्याने मैदानात उतरतात. वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा आणि प्रियांश आर्य यांसारख्या स्फोटक फलंदाजांच्या युगात पॉवरप्ले म्हणजे जणू युद्धच बनलं आहे. अनेक संघांनी तर डावाच्या पहिल्याच षटकात गोलंदाजांची अक्षरशः धुलाई केली आहे. आयपीएल इतिहासात पहिल्या षटकात सर्वाधिक धावा करणाऱ्या संघांविषयी जाणून घेऊया.
आयपीएलच्या इतिहासात पहिल्या षटकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम राजस्थान रॉयल्सच्या नावावर आहे. 2023 मध्ये कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात राजस्थानने पहिल्याच षटकात तब्बल 26 धावा केल्या होत्या. त्या षटकात एकट्या यशस्वी जैस्वालने 2 षटकार आणि 3 चौकार ठोकत गोलंदाजांची झोप उडवली होती.
या यादीत दुसऱ्या क्रमांकावर दिल्ली कॅपिटल्स आहे. दिल्लीने 2021 मध्ये कोलकाताविरुद्ध पहिल्या षटकात 24 धावा वसूल केल्या होत्या.
याच हंगामात फिन अॅलन ने आक्रमक फलंदाजीचा कहर करत कोलकाता नाइट रायडर्सला पहिल्याच षटकात 24 धावांपर्यंत पोहोचवलं. तर पंजाब किंग्सने आयपीएल 2026 मध्ये दिल्लीविरुद्ध पहिल्या षटकात 22 धावा चोपल्या होत्या. राजस्थान रॉयल्सनेही एका सामन्यात पहिल्या षटकात 22 धावा केल्या आहेत.
ही गोष्ट आयपीएलच्या दुसऱ्या हंगामातील आहे, जेव्हा नमन ओझा गोलंदाजांसाठी संकट बनले होते. राजस्थानने कोलकाताविरुद्धच्या सामन्यात पहिल्याच षटकात 21 धावा फटकावल्या होत्या.
पहिल्या षटकात सर्वाधिक धावा करणारे आयपीएल संघ :
२६ धावा – राजस्थान रॉयल्स
24 धावा – दिल्ली कॅपिटल्स
24 धावा – कोलकाता नाईट रायडर्स
२२ धावा – राजस्थान रॉयल्स
22 धावा – पंजाब किंग्स
हे ही वाचा –
WTC Points Table मध्ये मोठा उलटफेर! बांगलादेशने पाकिस्तानला लोळवलं, भारताचं समीकरण बिघडलं
आणखी वाचा
Comments are closed.