धक्कादायक! मुंबईतील भायखळा परिसरात गोळीबार; एक जण जखमी, हल्लेखोर पसार, पोलीस घटनास्थळी दाखल

मुंबई क्राईम न्यूज : मुंबईतील भायखळा परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. भायखळा परिसरात काही वेळापूर्वी गोळीबाराची घटना घडली आहे. या घटनेत एक जण जखमी झाला आहे. समीर शेख असं जखमी झालेल्याचे नाव आहे. या घटनेप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे.

भायखळा पोलीस ठाण्याचे अधिकारी तसेच क्राइम ब्रांचची टीम घटनास्थळी दाखल

भायखळा परिसरात काही वेळापूर्वी गोळीबाराची घटना घडली असून, समीर नावाच्या व्यक्तीवर अज्ञात हल्लेखोरांनी गोळी झाडल्याची माहिती समोर आली आहे. या गोळीबारीत समीर यांच्या पायाला गोळी लागली असून, त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर कोण होते आणि गोळीबारामागचे नेमके कारण काय होते, याचा तपास सुरू आहे. या घटनेनंतर भायखळा पोलीस ठाण्याचे अधिकारी तसेच क्राइम ब्रांचची टीम घटनास्थळी दाखल झाली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुरावे तपासले जात आहेत.
या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मांडीला गोळी लागल्याने आसिफ दाढीचा मुलगा समीर शेख जखमी

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, डी कंपनीचा हस्तक आसिफ दाढीच्या मुलावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे.  डोक्यार्ड रोड परिसरात गोळीबार झाल्याची माहिती मिळत आहे. मांडीला गोळी लागल्याने आसिफ दाढीचा मुलगा समीर शेख जखमी झाला आहे. गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर पसार झाले आहेत.  समीर शेखला जे जे रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. भायखळा पोलीस घटनास्थळी दाखल झआले आहेत. दरम्यान, गोळीबाराच कारण अद्याप अस्पष्ट हे. दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांकडून गोळीबार केला आहे.  गोळीबार करून दोघेही हल्लेखोर पसार झाले आहेत.

आणखी वाचा

Comments are closed.