नांदेडमधील माष्टी गावात दोन गटांमध्ये वाद, 34 जणांवर गुन्हा दाखल, गावात पोलिसांचा मोठा बंदोबस्त
नांदेड : नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील माष्टी गाव सध्या चांगले चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी या गावात 2 गटात हाणामारी झाली होती. त्यात एका गटाचे 10 ते 15 लोक जखमी झाले होते. या प्रकरणी 2 गटाच्या 34 लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तर 24 जणांना अटक करण्यात आली आहे. दोन्ही गटातील लोकांनी कुंडलवाडी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार केली आहे.
एका गटाने भीम जयंतीचा राग मनात धरून हल्ला केल्याचे फिर्याद सुनील सोनकांबळे यांनी दिली तर दुसऱ्या गटाच्या भक्ती बालाजी कदम यांनी अमानुष मारहाण केल्याची तक्रार दिली आहे. काही दिवसांपूर्वी गावात भीम जयंती उत्सव ग्राम पंचायत येते मोठ्या उत्साहात साजरी झाली होती. त्यात संपूर्ण गाव सहभागी झाले होते. त्यानंतर लहान मुलांचा शुल्लक करणावरून वाद झाला त्यानंतर दोन्ही गट सामोरा समोर आले होते. त्यानंतर जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केल्याची फिर्याद सुनील सोनकांबळे यांनी दिली. तर त्यांचा फिर्यादी वरुन 11 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर दुसरी फिर्यादी ही भक्ती कदम यांनी दिली आहे. त्याचा फिर्यादी वरुन 8 जणांना ताब्यात घेतले आहे. या प्रकारामुळे माष्टी या गावांमध्ये काही काळ तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधीक्षकांनी गावात भेट दिल्यानंतर गावात आता शांतता आहे पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. तसेच या गावांमध्ये आम्हाला पिण्याचे पाणी दळण सुद्धा देत नसल्याचा आरोप एका गटाकडून करण्यात आला होता. त्यावर दुसऱ्या गटाने मात्र ही आरोप फेटाळले आहे गावात आम्ही सगळे गुण्या गोविंदाने राहत असल्याची प्रतिक्रिया दुसऱ्या गटांनी दिली आहे.
गावातील पीठाची गिरणी ही अनेक दिवसा पासून बंद असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले आहे. तसेच गिरणी चालकाला जेव्हा विचारले असता आमची पिठाची गिरणी ही बंद आहे संपूर्ण गाव हे कुंडलवाडी या गावी जाऊन दळण दळून आणते. गावात गिरणी सुरू असताना आम्ही सगळ्यांना दळण देत होते. कधी भेद भाव केला नाही. माझ्या नवऱ्याचे निधन झाल्यापासून ही गिरणी बंद असल्याचे अनिता दत्तहरी जाधव यांनी सांगितले. या संपूर्ण प्रकारणा बाबत तहसीलदार सुरेखा स्वामी यांन विचारले असता प्रार्थमिक माहिती ज्यावेळी आम्ही घेतली तेव्हा आमच्या लक्षात असले की शेजारील दोन लहान मुलांमध्ये भांडण झाले आहे. त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. या घटनेमध्ये लहान मुलांचा वाद हा प्रथमदर्शनी दिसून येत आहे. त्यांच्या आरोप संदर्भात तहसीलदार यांना विचारले असल्यास गटविका, अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली आहे. पिण्याचा पाण्याची व्यवस्था सर्वांसाठी खुले आहे आणि ग्रामपंचायतीच्या मार्फत जो आरो प्लांट तिथे बसवलाय तो खुला आहे. जर कोणी अडवणूक केली तर त्यावर आम्ही प्रतिबंधक कारवाई करू असे आव्हान तहसीलदार सुरेखा स्वामी यांनी केले माष्टी गावात सध्या पोलिसांचा कडक बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.
आणखी वाचा
Comments are closed.