पिंपरीच्या महापौरांना परदेश दौऱ्याची मान्यता, मोदींच्या आवाहनानंतर रवी लांडगे कोणता निर्णय घेणा
पिंपरी चिंचवड: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशहितासाठी काटकसर करा असं म्हणत परदेश वाऱ्या टाळण्याचं आवाहन केलं आणि त्यानंतर काही तासांतच महाराष्ट्र शासनाने पिंपरी चिंचवडच्या महापौरांना (Pimpri-Chinchwad Mayor Ravi Landge) परदेश दौऱ्याची मान्यता दिली आहे. केंद्रात, राज्यात आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता आहे, तरी सुद्धा महाराष्ट्र शासनाने पंतप्रधान मोदींचं आवाहनाला छेद दिला आहे. आता महापौर रवी लांडगे (Pimpri-Chinchwad Mayor Ravi Landge) हे पंतप्रधानांच्या आवाहनानुसार देशहितासाठी हा परदेश दौरा रद्द करणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. (Pimpri-Chinchwad Mayor Ravi Landge)
Ravi Landge : रवी लांडगेंच्या परदेशी वारीचं काय आहे कारण?
संयुक्त राष्ट्रांच्या UN-Habitat संस्थेचे वर्ल्ड अर्बन फोरम हे तेरावे अधिवेशन आहे. यामध्ये शहरी विकास विषयक जागतिक परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. बाकु अझरबैजान येथे पार पडणाऱ्या या परिषदेला रवी लांडगे आणि त्यांचे स्वीय सहाय्यक अभय चौगुले उपस्थित राहणार आहेत. 17 मे ते 22 मे दरम्यान हे जागतिक अधिवेशन पार पडणार असून पिंपरी पालिकेच्या स्थायी समितीने या दौऱ्यासाठी निधी ही मंजूर केला आहे. या दौऱ्यावर 8 लाख 80 हजार 281 रुपयांची उधळपट्टी केली जाणार आहे. पंतप्रधान मोदींनी 10 मे ला देशहितासाठी जनतेला आवाहन केलं. काटकसर करण्यावर भर द्या, असं आवर्जून सांगितलं. पण दुसऱ्याच दिवशी म्हणजे 11 मे ला भाजपचं सरकार असलेल्या महाराष्ट्र शासनाने महापौरांच्या परदेश दौऱ्याला मान्यता देत पंतप्रधानांच्या आवाहनाला छेद दिला आहे. आता पिंपरी चिंचवडचे महापौर रवी लांडगे देशहितासाठी हा परदेश दौरा रद्द करणार का? शहराचे प्रथम नागरिक असलेले रवी लांडगे याबाबत काय निर्णय घेतात? याकडे पिंपरी चिंचवड शहरवासीयांचं लक्ष लागून आहे.
रवी लांडगे: मोदींच्या आवाहनानंतर पिंपरीचे महापौर परदेश दौऱ्यावर ठाम, पण….
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशहितासाठी काटकसर करण्याचं आवाहन केलंय, त्यानंतर ही पिंपरी चिंचवडचे महापौर रवी लांडगे परदेश दौऱ्यावर ठाम आहेत. मी फिरायला नव्हे तर विकासाच्या दृष्टीने होणाऱ्या जागतिक अधिवेशनासाठी अझरबैजानला निघालोय, असं म्हणत लांडगेंनी परदेश दौऱ्यावर जाणार असल्याचं म्हटलंय. केंद्रात, राज्यात आणि पिंपरी चिंचवड मध्ये ही भाजपची सत्ता असताना महापौरांनी ही भूमिका घेतल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातंय. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सर्व मंत्र्यांना परदेश दौरे रद्द करण्याचे आदेश दिलेत, हा आदेश अभ्यास दौऱ्यांच्या अनुषंगाने असेल तर मी सुद्धा माझा हा परदेश दौरा रद्द करेन. असं महापौर लांडगेंनी म्हटलंय. लांडगे हे 17 मे ला अझरबैजानला दौऱ्यावर जाणार आहेत, तत्पूर्वी ते हा दौरा रद्द करतात की दौऱ्यावर ठाम राहतात? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
Narendra Modi : नरेंद्र मोदींनी देशाला कोणती आवाहनं केली?
सोन्याची खरेदी टाळा
पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करा
वर्क फ्रॉम होमला प्राधान्य द्या
परदेश प्रवास टाळा
खाद्यतेलाचा वापर कमी करा
नैसर्गिक शेतीचा अवलंब करा
स्वदेशी उत्पादनं वापरा
PM Narendra Modi: मोदींनी आपल्या ताफ्यातील गाड्यांची संख्या निम्मी केली
देशातील जनतेला इंधन बचतीचे आवाहन करत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी स्वतः एक मोठा निर्णय घेतला आहे. सूत्रांनुसार, पंतप्रधान मोदींनी (PM Narendra Modi) आपल्या ताफ्यातील गाड्यांची संख्या निम्मी केली आहे. याबाबत त्यांनी आपल्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या ‘स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप’ला (SPG) आदेश दिले आहेत. पंतप्रधानांनी आपल्या ताफ्यात ५० टक्के कपात केली आहे. वडोदरा आणि आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा यांच्या शपथविधीसाठी गेलेल्या गुवाहाटी दौऱ्यात पंतप्रधानांच्या ताफ्यात ही कपात दिसून आली. ताफ्यात इलेक्ट्रिक गाड्यांचा वापर वाढवावा, मात्र त्यासाठी नवीन खरेदी करू नये, असे निर्देश एसपीजीला देण्यात आले आहेत.(पंतप्रधान नरेंद्र मोदी)
Narendra Modi : पंतप्रधान मोदींनी जनतेला केले होते हे आवाहन
हैदराबादमध्ये जनतेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, “मी देशातील प्रत्येक नागरिकाला आवाहन करतो की, त्यांनी पेट्रोल आणि डिझेलचा वापर शक्य तितका कमी करावा. मेट्रो, इलेक्ट्रिक बस आणि सार्वजनिक वाहतुकीचा जास्तीत जास्त वापर करा आणि कारपूलिंगला प्रोत्साहन द्या. ज्यांच्याकडे कार आहे, त्यांनी एकाच गाडीतून जास्तीत जास्त लोकांना सोबत नेले पाहिजे.”
आणखी वाचा
Comments are closed.