IPL 2026: क्लासेनचा धमाका! रोहित शर्माच्या ऐतिहासिक विक्रमी यादीत हेनरिक क्लासेनचा समावेश
आयपीएल 2026(Indian premiere league 2026) मध्ये सनरायझर्स हैदराबादचा (SRH) धडाकेबाज फलंदाज हेनरिक क्लासेन (Heinrich Claasen)
सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. हंगामातील 56 सामने पूर्ण झाले असून, सर्वाधिक धावा करून क्लासेनने ‘ऑरेंज कॅप’ आपल्या नावावर केली आहे. त्याने 12 सामन्यांच्या 12 डावांत 50.80 च्या सरासरीने आणि 153 .94 च्या स्ट्राईक रेटने 508 धावा केल्या आहेत.
ऑरेंज कॅपच्या शर्यतीत पहिल्या पाचमध्ये असणारे इतर सर्व फलंदाज हे ‘टॉप ऑर्डर’ (वरच्या फळीतील) आहेत. मात्र, क्लासेन हा एकमेव असा खेळाडू आहे जो मध्य फळीत (Middle Order) खेळूनही सर्वाधिक धावांच्या यादीत अव्वल स्थानी आहे. यासह त्याने आयपीएलच्या इतिहासात एका खास विक्रमी यादीत स्थान मिळवले आहे, ज्यात रोहित शर्माचाही (Rohit Sharma) समावेश आहे.
आयपीएलच्या एकाच हंगामात क्रमांक 4 किंवा त्याखाली फलंदाजी करताना 500 हून अधिक धावा करणाऱ्या निवडक खेळाडूंच्या क्लबमध्ये आता क्लासेन सामील झाला आहे. सध्या या यादीत ऋषभ पंत (Rishbh pant) पहिल्या क्रमांकावर आहे.
एका आयपीएल हंगामात नंबर 4 किंवा खाली फलंदाजी करताना 500+ धावा
ऋषभ पंत: 579 धावा (दिल्ली डेअरडेविल्स, 2018)
रियान पराग: 573 धावा (राजस्थान रॉयल्स, 2024)
रोहित शर्मा: ५३८ धावा (मुंबई इंडियन्स, २०१३)
ग्लेन मॅक्सवेल: 513 धावा (आरसीबी, 2021)
हेन्रिक क्लासेन: 508* धावा (सनरेज हैदराबाद, 2026)
महत्त्वाची गोष्ट म्हणजे, क्लासेनकडे अजून सामने शिल्लक असल्याने त्याला ऋषभ पंतचा विक्रम मोडण्याची मोठी संधी आहे. हेनरिक क्लासेनची आयपीएल कारकीर्द पाहायची झाल्यास, क्लासेनच्या आतापर्यंतच्या आयपीएल प्रवासावर नजर टाकली तर त्याची आकडेवारी प्रभावी आहे. त्याने 61 सामन्यांतील 57 डावांमध्ये 42. 29 सरासरी आणि 165. 39 च्या स्ट्राइक रेटने एकूण 1988 धावा केल्या आहेत. ज्यात 12 अर्धशतके आणि 2 शतकांचा समावेश आहे. तसेच त्याची 105 ही सर्वोच्च धावसंख्या आहे. क्लासेनचा हा फॉर्म पाहता, सनरायझर्स हैदराबादसाठी तो या हंगामात ‘मॅच विनर’ ठरत आहे हे स्पष्ट आहे.
Comments are closed.