आयपीएलच्या गुणतालिकेत मोठा बदल! 2 संघ बाहेर, 8 संघांसाठी अस असणार प्लेऑफचं गणित

आयपीएल २०२६ स्पर्धेत मंगळवारी झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात गुजरातने हैदराबादवर एकतर्फी विजयाची नोंद केली. १६९ धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या हैदराबादचा डाव अवघ्या ८६ धावांवर आटोपला. यासह गुजरातने हा सामना ८२ धावांनी खिशात घातला. या विजयानंतर गुजरातचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचला आहे. तर हैदराबादला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान गुणतालिकेत कोणता संघ कितव्या स्थानी आहे? कोणत्या संघाला प्लेऑफमध्ये जाण्याची संधी आहे? जाणून घ्या.

शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या गुजरात टायटन्सने प्लेऑफमध्ये आपला प्रवेश जवळजवळ निश्चित केला आहे. १६ गुणांसह हा संघ अव्वल स्थानी आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ १४ गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. हैदराबादचा संघ १४ गुणांसह तिसऱ्या स्थानी घसरला आहे. प्लेऑफमध्ये जाण्यासाठी प्रबळ दावेदार मानला जाणारा पंजाबचा संघ १३ गुणतालिकेत चौथ्या स्थानी आहे. या चारही संघांना प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याची सुवर्णसंधी आहे. पण मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स संघ सोडून इतर संघ देखील प्लेऑफच्या शर्यतीत आहेत.

गुजरातने हैदराबादला पराभूत करून १६ गुणांचा आकडा गाठला आहे. यासह गुजरातचा संघ जवळजवळ प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. गुजरातचा संघ १६ गुणांपर्यंत पोहोचणारा पहिलाच संघ ठरला. इथून पुढे गुजरातचे आणखी २ सामने शिल्लक आहेत. हे दोन्ही सामने जिंकून गुजरातकडे टॉप २ मध्ये फिनिश करण्याची संधी असणार आहे.

सनरायझर्स हैदराबाद – हैदराबादला प्लेऑफमध्ये स्थान निश्चित करण्यासाठी आणखी एका विजयाची गरज आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – या संघाने ११ पैकी ७ सामने जिंकले आहेत. गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी असलेल्या या संघाला ३ पैकी एक सामना जिंकायचा आहे.

पंजाब किंग्स – पंजाब किंग्स संघाला उर्वरित ३ पैकी २ सामने जिंकावे लागणार आहेत.

चेन्नई सुपर किंग्स – चेन्नई सुपर किंग्स संघाला देखील ३ पैकी २ सामने जिंकावे लागणार आहेत.

राजस्थान रॉयल्स – राजस्थान रॉयल्स संघाला देखील उर्वरित ३ सामन्यांपैकी २ सामने जिंकावे लागणार आहेत.

Comments are closed.