IPL 2026 – हैदराबादचा कर्णधार कमिन्सला 12 लाखांचा दंड

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

सनरायझर्स हैदराबादला संघाला गेल्या सामन्यात मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर हैदराबादच्या संघाला असून एक धक्का बसला आहे. कारण या सामन्यानंतर कर्णधार पॅट कमिन्सला शिक्षा ठोठावण्यात आली आहे. आयपीएल व्यवस्थापनाने संथगतीने षटके टाकल्याबद्दल कमिन्सला 12 लाख रुपयांचा रुपयांचा दंड ठोठावला.

गुजरातचे 169 धावांचे लक्ष्य गाठताना हैदराबादचा संघ अवघ्या 14.5 षटकांत 86 धावांवर गारद झाला. आयपीएलच्या इतिहासातील हैदराबादची ही सर्वात कमी धावसंख्या आहे. त्यांची यापूर्वीची सर्वात कमी धावसंख्या 2019 मध्ये मुंबईविरुद्ध 96 होती, पण यावेळी गुजरातच्या गोलंदाजांनी हैदराबादला तो टप्पा गाठू दिला नाही. धावांच्या फरकाच्या दृष्टीने हा फ्रँचायझीचा सर्वात मोठा पराभव ठरला.

एवढा मोठा पराभव आणि वैयक्तिक दंड होऊनही पॅट कमिन्सने आपला संयम गमावलेला नाही. सामन्यानंतर त्याने कबूल केले की, गुजरातच्या गोलंदाजांनी परिस्थितीचा प्रभावीपणे फायदा घेतला आणि त्याचा संघ प्रत्युत्तर देण्यात अपयशी ठरला होता.

Comments are closed.