'शून्याच्या दु:खात' विराट कोहलीने फोडला 'शतकाचा बॉम्ब', 14 हजारांचा टप्पा गाठत रचला विश्वविक्रम!

आयपीएल २०२६ मध्ये विराट कोहलीने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध शतक झळकावले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या या सलामीवीराने शतकाबरोबरच टी२० क्रिकेटमध्ये मोठ्या विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. मागील दोन सामन्यांमध्ये भोपळाही न फोडता आलेल्या विराटने आयपीएलच्या या १९ व्या हंगामातील ५७ व्या सामन्यात थेट शतकी खेळी करत अनेक विक्रम रचले आणि मोडले आहेत.

विराटने ६० चेंडूंत ११ चौकार आणि ३ षटकारांच्या सहाय्याने नाबाद १०५ धावा केल्या. त्याचे हे आयपीएलमधील नववे शतक तर टी२० क्रिकेटमधील दहावे शतक ठरले आहे. त्याने अभिषेक शर्माचा (९ शतके) विक्रम मोडून टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारा भारतीय खेळाडू बनण्याचा मान मिळवला आहे. या प्रकारामध्ये केवळ चार खेळाडूंनी १० किंवा त्यापेक्षा अधिक शतके केली आहे.

शतकी खेळी करण्याबरोबर विराटने क्रिस गेलचे दोन विक्रम मागे टाकले आहेत. तो टी२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद १४००० धावांचा टप्पा गाठणारा फलंदाज ठरला आहे. त्याने ४०९ डावांतच हा विश्वविक्रमी टप्पा गाठत गेलला (४२३ डाव) मागे टाकले आहे. दुसरा विक्रम म्हणजे तो आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक वेळा ७५ पेक्षा अधिक धावा (२४ वेळा) करणारा फलंदाज ठरला आहे.

टी२० मध्ये सर्वात कमी डावांत १४,००० धावा पूर्ण
४०९ – विराट कोहली
423 – ख्रिस गेल
४३१ – डेव्हिड वॉर्नर
468 – जोस बटलर
505 – ॲलेक्स हेल्म्स

टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके
22 – ख्रिस गेल
१३ – बाबर आझम
१० – डेव्हिड वॉर्नर
१० – विराट कोहली*
9 – रायली रुसो / साहिबजादा फरहान
9 – क्विंटन डी कॉक / अभिषेक शर्मा

टी२० क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक धावा:

ख्रिस गेल – १४५६२
किरॉन पोलार्ड – १४४८२
ॲलेक्स हेल्स – 14449
डेव्हिड वॉर्नर – १४२८४
जोस बटलर – 14200
विराट कोहली – 14001*

Comments are closed.