NEET पेपरफुटी प्रकरणात ‘घरकाही भेदी निकला’….; संशयाची सुई फिरली, CBI ने लगेच चक्र फिरवली, काय

NEET पेपर लीक 2026: नीट पेपर फुटीप्रकरणी (NEET Paper Leak Case) आतापर्यंत देशभरात सीबीआयने 6 आरोपींना अटक केली आहे. तर देशभरात अनेक ठिकाणी छापेही टाकण्यात आले आहेत. जयपूरमधून तीन, गुरुग्राममधून एक, नाशिक आणि अहिल्यानगरमधून एक आशा एकूण सहा आरोपींना अटक केली आहे. इतर अनेक संशयितांची चौकशी सुरू आहे. तसेच मोबाईल फोनसह अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि गुन्हेगारी पुरावा दर्शवणारी कागदपत्रे जप्त करण्यात आली आहे. नाशिकमधून शुभम खैरनार (shubham khairnar), अहिल्यानगरहून धनंजय लोखंडे (dhananjay lokhande), जयपूरमधून मांगीलाल बिवाल, विकास बिवाल आणि दिनेश बिवाल तर गुरुग्राममधून यश यादव अशा एकूण 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

NEET पेपरफुटी प्रकरणासंदर्भात सध्या एक मोठी माहिती समोर येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयला खुद्द NTA (National Testing Agency) मध्येच काही अनियमितता असल्याचा संशय आहे. NTA मधीलच एखादी ‘अंतर्गत व्यक्ती’ संवेदनशील माहिती बाहेर फोडत असल्याचा सीबीआयला तापासातून संशय आला आहे. त्यामुळे आता सीबीआयने आता या अँगलने तपास वेगाने पुढे करत आहे. तसेच, या पेपरफुटीमागे एक सुस्थापित आणि संघटित टोळी कार्यरत असल्याचेही या तपास यंत्रणेच्या निदर्शनास आले आहे. काल, सीबीआयच्या एका पथकाने दिल्लीतील NTA कार्यालयाला भेट देऊन या प्रकरणाचा तब्बल दहा तास तपास केला. दरम्यान, या प्रकरणाशी संबंधित सर्वात आधी ज्या टोळीचे नाव समोर आले होते, त्या बिहारस्थित टोळीची भूमिका आणि त्यांचे जाळे यांचीही आता पुन्हा नव्याने छाननी केली जात आहे.

शुभम खैरनारच्या कार्यालयातून होणार महत्वाचे खुलासे- (NEET Paper Leak 2026)

नाशिकच्या नामांकित कॅनडा कॉर्नर परिसरात नीट पेपर फुटी प्रकरणातील संशयित आरोपी शुभम खैरनारचे वैद्यकीय प्रवेश आणि मार्गदर्शन केंद्र आहे. तो गेल्या दोन ते तीन वर्षांपासून ह्या एस आर एज्युकेशन कन्सल्टन्सी कार्यालयामध्ये विद्यार्थ्यांना ऍडमिशन प्रोसेस मार्गदर्शन आणि संपूर्ण मॅनेजमेंट आणि इतर वैद्यकीय प्रवेशासाठी प्रक्रिया करून देत होता. या कार्यालयातून त्याचा नेमकं काय काम सुरू होतं कोण कोणत्या विद्यार्थ्यांना त्यांनी या वैद्यकीय मार्गदर्शन केंद्रातून प्रवेश मिळून दिला आणि त्या विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने हा प्रवेश वैद्यकीय क्षेत्रात मिळाला, याची सखोल चौकशी आता तपासणी करण्याच्या माध्यमातून देखील केली जाणार असल्याची माहिती आहे एकूणच या प्रकरणात शुभम खैरनार याच्या कार्यालयातील नेमकं काय कामकाज सुरू होता यातून देखील अनेक नीट पेपर फुटी प्रकरणातील महत्त्वाचे खुलासे होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

NEET परीक्षा का रद्द करण्यात आली? (NEET परीक्षा 2026 का रद्द केली?)

  1. राजस्थानातील सीकरमध्ये नीट परीक्षेपूर्वी ‘गेस पेपर’चे वितरण
  2. ‘गेस पेपर’मध्ये एकूण 410 प्रश्न होते
  3. ‘गेस पेपर’मधील 120 ते 135 प्रश्न नीटच्या परीक्षेत जसेच्या तसे
  4. नीटच्या परीक्षेशी जुळलेले बहुतांश प्रश्न रसायनशास्त्र विषयाचे
  5. प्रश्नांतील साधर्म्य हा अचूक अंदाज की पेपरफुटी याची चौकशी झाली
  6. प्राथमिक चौकशीतील बाबी पाहून परीक्षा रद्द करण्याचा निर्णय

संबंधित बातम्या:

NEET Paper Leak 2026: NEET पेपरफुटी प्रकरणात नवा ट्विस्ट; सीबीआयच्या तपासात चक्रावून टाकणारी माहिती, नेमकं काय काय घडलेलं?

NEET Paper Leak: सायबर सुरक्षेचा विद्यार्थीच सामील, धनंजय लोखंडेने सोपवलेली मोठी जबाबदारी, NEET पेपरफुटी प्रकरणात धक्कादायक खुलासे

शैक्षणिक कर्ज माहिती:
शैक्षणिक कर्ज EMI ची गणना करा

आणखी वाचा

Comments are closed.