ज्याची भीती होती, तेच झालं…, देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले; पाहा मुंबईसह महत्वाच्या शह

पेट्रोल-डिझेल दरवाढ पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या काटकसरीच्या आवाहनानंतर देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol And Diesel Prices Rise) वाढले आहेत. पेट्रोल 3 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 3.11 रुपये प्रति लीटर इतके महागले आहे. गेल्या काही दिवसांपासून, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (क्रूड ऑइल) वाढत्या किमतींचा परिणाम लवकरच देशांतर्गत ग्राहकांवर होईल, अशी चर्चा सुरू होती. अखेर, तेल कंपन्यांनी आजपासून (15 मे) इंधनाच्या किमतींमध्ये सुधारणा केली. शुक्रवारी सकाळी 6 वाजल्यापासून, देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. (Petrol-Diesel Price Hike)

दिल्लीमध्ये, नियमित पेट्रोलचा दर 94.77 रुपये प्रति लिटरवरून वाढून 97.77 रुपये झाला आहे. डिझेलचा दर 87.67 रुपये प्रति लिटरवरून वाढून 90.67 रुपये झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमधील चढ-उतार आणि रुपयाचे अवमूल्यन यामुळे ही दरवाढ लागू करण्यात आली आहे. मध्य-पूर्वेकडील संघर्षामुळे इंधनाच्या पुरवठ्यात असलेली कमतरता अद्यापही कायम आहे; ज्याचा थेट परिणाम आता इंधनाच्या किमतींमध्ये दिसून येत आहे. दरम्यान, गेल्या चार वर्षांपासून स्थिर असलेल्या या दरांमध्ये आज लक्षणीय बदल झाला आहे. 28 फेब्रुवारी रोजी इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष उफाळून आला असूनही, सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ दरांमध्ये वाढ करणे दीर्घकाळापर्यंत टाळले होते; तथापि, तेल कंपन्यांना होत असलेल्या तोट्याच्या पार्श्वभूमीवर, सरकारने अखेर इंधनाचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला. (Petrol-Diesel Price Hike)

पंतप्रधान मोदींनी इंधन बचतीचे केले आहे आवाहन- (Petrol-Diesel Price Hike)

गेल्या रविवारी, सध्याच्या संकटाची दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परकीय चलन वाचवण्याच्या उद्देशाने काही उपाययोजना करण्याचे आवाहन केले होते. यामध्ये इंधनाचा काटकसरीने वापर करणे, सोन्याची खरेदी पुढे ढकलणे आणि परदेश प्रवास स्थगित करणे यांसारख्या गोष्टींचा समावेश होता. रुपयाच्या मूल्यात मोठी घसरण झाली असून, सध्या अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य 95 च्या पातळीच्या खाली घसरले आहे.

आजचे महत्वाच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर- (Petrol-Diesel Price Hike)

शहराचं नाव          नवीन दर (पेट्रोल)   नवीन दर (डिझेल)

मुंबई – 106.54 93.14
दिल्ली – 97.77 90.78
चेन्नई – 103.84 95.50
कोलकाता – 108.41 95.13
पुणे – 107.84 94.45
बंगळुरू –             102.96              94.10

महागाईचा महा-विस्फोट! एप्रिलमध्ये घाऊक महागाई 8.30 टक्क्यांवर- (inflation in india)

देशात महागाईचा दबाव आता अत्यंत वेगाने वाढत असल्याचे चिंताजनक चित्र समोर आले आहे. एप्रिल 2016 मध्ये देशाचा घाऊक महागाई दर (WPI) वाढून थेट 8.30 टक्क्यांवर पोहोचला आहे. मार्च महिन्यात हा दर 3.88 टक्के इतका होता. अवघ्या महिनाभरात झालेली ही वाढ गेल्या 42 महिन्यांचा म्हणजेच साडेतीन वर्षांचा विक्रम मोडणारी ठरली आहे. पेट्रोल, डिझेल, एलपीजी आणि कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली प्रचंड वाढ हे या महागाईमागचे मुख्य कारण मानले जात आहे. या महागाईच्या वाढीमध्ये ‘फ्यूल आणि पॉवर’ क्षेत्राचे योगदान सर्वाधिक राहिले आहे. मार्चमध्ये केवळ 1.05 टक्क्यांवर असलेली या क्षेत्रातील महागाई एप्रिलमध्ये थेट 24.71 टक्क्यांवर झेपावली आहे.

संबंधित बातमी:

WPI Data April 2026: महागाईचा महा-विस्फोट! एप्रिलमध्ये घाऊक महागाई 8.30 टक्क्यांवर, 42 महिन्यांचा रेकॉर्ड मोडला

आणखी वाचा

Comments are closed.