T20 mumbai league 2026 – ‘पालघर एक्सप्रेस’ शार्दूल ठाकूरकडे ईगल ठाणे स्ट्रायकर्सचे नेतृत्व
टी२० मुंबई लीग २०२६ च्या आगामी हंगामासाठी ‘ईगल ठाणे स्ट्रायकर्स’ संघाने आपला अधिकृत संघ जाहीर केला आहे. लीगच्या चौथ्या हंगामात मैदानात उतरण्यासाठी ठाण्याच्या संघाने अनुभवी खेळाडू आणि उदयोन्मुख युवा प्रतिभेचा उत्तम मेळ साधला आहे. गेल्या हंगामात उपांत्य फेरीत ८ गडी राखून पराभव स्वीकारला लागल्यामुळे ईगल ठाणे स्ट्रायकर्सचे अंतिम फेरीतील स्थान थोडक्यात हुकले होते. त्यामुळे यंदाच्या हंगामात अधिक जोमाने पुनरागमन करण्यासाठी संघाचे नेतृत्व पुन्हा एकदा भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू शार्दूल ठाकूर याच्याकडे सोपवण्यात आले आहे. शार्दूलच्या उपस्थितीमुळे संघाची ताकद कमालीची वाढली आहे.
ईगल ठाणे स्ट्रायकर्सचा संपूर्ण संघ –
शार्दूल ठाकूर (कर्णधार), आदित्य विनोद गिरी, अमर्त्य राजे, अनुज विनोद गिरी, अथर्व अंकोलेकर, अयान मोहित जैन, एकनाथ दिनेश केरकर, कार्तिक मिथिलेश मिश्रा, मनन भट, ओंकार तुकाराम तरमळे, रोहन राजेंद्र घाग, साईराज पाटील, शशिकांत एकनाथ कदम, शाश्वत योगेश जगताप, शॉन मोतीराम रॉड्रिक्स, शिवांश लल्लन सिंग, सिद्धांत मनोज सिंग, सुमीर सम्राट झवेरी, विनय सुरेश कुंवर आणि धनेय पारेख.
Comments are closed.