आधी जामीन अर्जाला विरोध, आता कोर्टात म्हटलं ‘नजरचूक’! विकास लवांडेंच्या अटकेनंतर पुणे पोलिसांच्
विकास लवांडे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCP Sharad Pawar Faction) नेते तथा प्रवक्ते विकास लवांडे (Vikas Lawande) यांच्या अटकेनंतर आता एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जो गुन्हा विकास लवांडे यांनी कधी केलाच नव्हता, तो गुन्हा त्यांच्या नावावर दाखवून पुणे पोलिसांनी गुरुवारी त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जाला न्यायालयात जोरदार विरोध केला होता. मात्र, आज पुणे पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या रिमांड रिपोर्टमध्ये ‘नजरचुकीने’ हा प्रकार घडल्याचे मान्य केले आहे. पोलिसांच्या या अजब कारभारामुळे आता पुणे पोलिसांच्या (Pune Police) कार्यशैलीबद्दल मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
विकास लवांडे यांच्यावर 8 मे रोजी वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात अटक टाळण्यासाठी लवांडे यांनी न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. या अर्जाला विरोध करताना पोलिसांनी लवांडे यांच्यावर यापूर्वी दाखल असलेल्या गुन्ह्यांची (गुन्हेगारी पार्श्वभूमी) माहिती न्यायालयासमोर ठेवली होती.
या माहितीमध्ये पोलिसांनी 2017 साली पुण्यातील बिबवेवाडी पोलीस ठाण्यात लवांडे यांच्यावर एक गुन्हा दाखल असल्याचा दावा केला होता. वास्तविक पाहता, 2017 मध्ये लवांडे यांनी नथुराम गोडसेच्या विरोधात आंदोलन केल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा (क्र. 32/17) दाखल झाला होता, जो 2022 मध्ये शासनाने मागे घेतला होता. मात्र, पोलिसांनी न्यायालयात 32/17 ऐवजी गुन्हा क्रमांक 33/17 दाखवला. हा गु.न्हं. 33/17 चक्क ‘गौतम कांबळे’ नावाच्या दुसऱ्याच आरोपीचा होता, ज्याने दारू पिऊन गोंधळ घातला होता. विशेष म्हणजे त्या गुन्ह्यातून कांबळे यांचीही निर्दोष मुक्तता झालेली आहे. हाच दुसऱ्याचा गुन्हा पोलिसांनी लवांडे यांच्या नावावर दाखवण्याचा प्रयत्न केला. यामुळे पुणे पोलिसांच्या कार्यशैलीबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
Vikas Lawande: वारकरी वादाची आणि शाईफेकीची पार्श्वभूमी
दरम्यान, विकास लवांडे हे गेल्या काही दिवसांपासून राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चांगलेच चर्चेत आहेत. ‘वारकरी संप्रदायात काही लोकांची घुसखोरी झाली आहे’, असा दावा करत लवांडे यांनी सोशल मीडियावर काही वारकऱ्यांची एक यादी प्रसिद्ध केली होती. या प्रकरणावरून त्यांच्यावर तीव्र टीका झाली होती आणि काही दिवसांपूर्वी पुण्यात त्यांच्यावर शाईफेक देखील करण्यात आली होती. या शाईफेकीनंतर शरद पवार यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांनी लवांडे यांचा दुग्धाभिषेक केला होता. या प्रकरणानंतर पोलिसांनी त्यांना काल (गुरुवारी) अटक केली होती.
Vikas Lawande: पुणे पोलिसांची चोर सोडून संन्याशाला फाशी..
शरद पवार यांच्या पक्षाकडून विकास लवांडे यांना जाणीवपूर्वक आणि खोट्या गुन्ह्याखाली अडकवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. लवांडे यांना अटक केल्यानंतरचा एक फोटोही समोर आला होता, ज्यामध्ये ते गाडीत पोलिसांच्या शेजारी बसलेले दिसून आले होते. यावेळी विकास लवांडे यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले होते की, पुणे पोलिसांची चोर सोडून संन्याशाला फाशी.. माझ्यावर जीवघेणा हल्ला करणारे गुंड संग्राम भंडारे व इतर सर्व आरोपी मोकाट असून वाघोली पोलीस स्टेशनचे पोलिस एका खोट्या फिर्यादीवरून कसलाही पुरावा नसताना मला अटक करण्यासाठी मला फोन न करता रात्री घरी आले मी घरी नव्हतो. ‘
कुटुंबीयांना माझ्या अटकेबाबत निरोप दिला कुटुंबांना घाबरवण्याचा हा प्रयत्न होता काय ? असा माझा सवाल आहे ? पोलीस मला फोन करू शकले असते. मी फरार नाही किंवा माफीवीर नाही. शासनाने मला जरूर अटक करावी मी पोलिसांना सहकार्य करणारा माणूस आहे कारण मी कायदा पाळणारा माणूस आहे कायदा हातात घेणारा माणूस नाही. सत्यासाठी लढत राहणार सत्याग्रही पद्धतीने जामीन , वकील ,दंड देणार नाही. पुणे पोलिसांनी मला जरूर अटक करावी मी तयार आहे, असे त्यांनी म्हटले होते.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.