IPL 2026 मध्ये नाही पण पुढच्या हंगामात महेंद्र सिंग धोनी मैदानात उतरणार? ऋतुराज गायकवाडने दिले थेट उत्तर

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

IPL 2026 मध्ये चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) प्रवास संपला आहे. गुरुवारी (21 मे) गुजरात टायटन्सने चेन्नईचा 89 धावांनी धुव्वा उडवला आणि ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील चेन्नईचे आव्हान प्लेऑफच्या शर्यतीतून संपुष्टात आले. चेन्नईचा यंदाचा संपूर्ण हंगाम ‘महेंद्र सिंग धोनी मैदानात उतरणार’, या वाक्यानेच निघून गेला. दुखापतीमुळे तो एकही सामना खेळू शकला नाही. गुजरातविरुद्धच्या पराभवानंतर कर्णधार ऋतुराज गायकवाडने धोनीच्या अनुपस्थितीवर खंत व्यक्त करताना सांगितले की, “माही भाईशिवाय खेळणे आमच्यासाठी खूप कठीण होते.”

गुजरातविरुद्धच्या सामन्यानंतर ऋतुराज गायकवाडला ‘धोनी पुढील हंगामात (IPL 2027) खेळताना दिसेल का?’ असा थेट प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना ऋतुराज म्हणाला, “याचे उत्तर पुढच्या वर्षीच समजेल. मला स्वतःलाही याबद्दल पुढील वर्षीच माहिती मिळेल.” ऋतुराजच्या या वक्तव्यावरून हे स्पष्ट होते की, एमएस धोनी आयपीएल 2027 मध्ये खेळणार की नाही, याचा निर्णय सर्वस्वी त्याचा स्वतःचा असेल आणि तो स्वतःच्या तंदुरुस्तीचा विचार करूनच यावर अंतिम निर्णय घेईल, अशी शक्यता आहे.

पैसाच पैसा… 100 कोटींचा पठ्ठ्या!!! 7 वर्षांचा जेतेपदाचा दुष्काळ संपला; अल नसर क्लबची रोनाल्डोवर पैशांची उधळण

एमएस धोनी यंदाच्या आयपीएलमध्ये दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता. सुरुवातीला तो केवळ दोन आठवडे बाहेर राहील असे सांगण्यात आले होते, पण दुखापत गंभीर असल्याने तो संपूर्ण हंगामाला मुकला. त्यातच गुजरातविरुद्धच्या शेवटच्या सामन्यापूर्वी त्याच्या अंगठ्यालाही दुखापत झाली, ज्यामुळे तो रांचीला आपल्या घरी परतला. धोनीने आतापर्यंत 278 आयपीएल सामन्यांमध्ये 38.30 च्या सरासरीने आणि 24 अर्धशतकांच्या मदतीने 5439 धावा केल्या आहेत. आता 2027 मध्ये तो पुन्हा मैदानात उतरतो की नाही, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

Comments are closed.