अर्शदीप सिंग पुन्हा वादाच्या भोवऱ्यात! तिलक वर्मानंतर आता 'या' खेळाडूवर कमेंट केल्याने सोशल मीडियावर ट्रोल
आयपीएल 2026 (IPL 2026) मध्ये पंजाब किंग्सने (PBKS) आपल्या सुरुवातीचे 6 सामने जिंकले होते. मात्र, शेवटच्या 6 सामन्यांमध्ये संघाला सलग पराभवाचा सामना करावा लागला आहे, ज्यामुळे त्यांचे प्ले-ऑफमध्ये पोहोचणे कठीण झाले आहे. अशातच, पंजाब किंग्सचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग एका नवीन वादामुळे अडचणीत आला आहे. अर्शदीपने संघातलाच खेळाडू प्रियांश आर्य (Priyansh Aarya) याच्यावर केलेल्या एका कमेंटमुळे नेटीझन्सनी त्याला सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वी त्याने तिलक वर्मावर वांशिक टिप्पणी (Racial Comment) केल्याचाही आरोप झाला होता.
अर्शदीप सिंगचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अर्शदीप पंजाबचा सलामीवीर (Opener) प्रियांश आर्यला म्हणतो, “किती गोड आहेस रे तू! तुझी स्माइल दाखव, तुझे दात दाखव.” हे बोलल्यानंतर अर्शदीप व्हिडिओ बनवत जोरात हसू लागतो. अर्शदीपची ही कमेंट काही लोकांना सामान्य वाटली, तर काहींनी यावरून त्याला ट्रोल केले. नेटीझन्सचा असा दावा आहे की, या व्हिडिओ दरम्यान प्रियांश खूप असहज (Uncomfortable) वाटत होता आणि म्हणूनच त्याने नंतर फोनवर बोलणे सुरू केले.
याआधी मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी अर्शदीप सिंगने एक व्हिडिओ बनवला होता, ज्यामध्ये तो तिलक वर्माला म्हणाला होता, ओय अंधेरे, सनस्क्रीन नाही लावली का?” त्याच्या या विधानाला वांशिक टिप्पणी मानून सोशल मीडियावर त्याच्यावर प्रचंड टीका झाली होती.
पंजाब किंग्स आपला साखळी फेरीतील (League Stage) शेवटचा सामना 23 मे रोजी लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध खेळण्यासाठी मैदानात उतरेल. हा सामना लखनऊ येथे होणार आहे. लखनऊचा संघ आधीच प्ले-ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे, पण पंजाब किंग्सला प्ले-ऑफच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी हा सामना जिंकणे अत्यंत आवश्यक आहे.
Comments are closed.