मध्य रेल्वेवर 13 तासांचा ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक जाहीर; अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द

मध्य रेल्वेकडून कल्याण-इगतपुरी विभागातील आतगाव स्थानकावर 13 तासांचा ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक राबवण्यात येणार आहे. इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी 6 जून रोजी दुपारी 2.00 वाजल्यापासून ते 7 जून रोजी पहाटे 3.00 वाजेपर्यंत हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या रद्द केल्या जातील, तर काही पर्यायी मार्गाने वळवण्यात येतील. काही गाड्यांच्या वेळा बदलल्या जातील किंवा त्यांना शॉर्ट टर्मिनेट करण्यात येईल.

ब्लॉक कालावधीत गाडी क्रमांक 11011 सीएसएमटी-धुळे, गाडी क्रमांक 11012 धुळे-सीएसएमटी, गाडी क्रमांक 12109 सीएसएमटी-मनमाड, गाडी क्रमांक 12110 मनमाड-सीएसएमटी या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

ब्लॉक कालावधीत अनेक गाड्या कल्याण, कर्जत, पुणे, दौंड आणि मनमाड या मार्गावरून वळवण्यात येतील. गाडी क्रमांक 11071 एलटीटी-बलिया, गाडी क्रमांक 01027 दादर-गोरखपूर, गाडी क्रमांक 15066 पनवेल-गोरखपूर, गाडी क्रमांक 11001 सीएसएमटी-बल्हारशाह, गाडी क्रमांक 12131 दादर-साईनगर शिर्डी (कल्याण, कर्जत, पुणे आणि साईनगर शिर्डी मार्गे), गाडी क्रमांक 17057 सीएसएमटी-लिंगमपल्ली (कल्याण, कर्जत, पुणे, दौंड आणि कुर्डुवाडी मार्गे) या गाड्यांचे मार्ग वळवण्यात येतील.

ब्लॉक कालावधीत गाडी क्रमांक 12072 हिंगोली डेक्कन-सीएसएमटी (सकाळी 4.15 वाजता सुटणारी) नाशिक येथे मुक्कामी थांबवण्यात येईल. गाडी क्रमांक 17611 नांदेड-सीएसएमटी (रात्री 10.00 वाजता सुटणारी) मनमाड येथे मुक्कामी थांबवण्यात येईल. गाडी क्रमांक 12071 सीएसएमटी-हिंगोली डेक्कन (सकाळी 4.15 वाजता सुटणारी) नाशिक येथे मुक्कामी थांबवण्यात येईल. गाडी क्रमांक 17611 सीएसएमटी-नांदेड (रात्री 10.00 वाजता सुटणारी) मनमाड येथे मुक्कामी थांबवण्यात येईल.

ब्लॉक कालावधीत 6 जून रोजी गाडी क्रमांक 12809 सीएसएमटी-हावडा, गाडी क्रमांक 18029 एलटीटी-शालीमार, गाडी क्रमांक 12167 एलटीटी-वाराणसी, गाडी क्रमांक 01079 सीएसएमटी-गोरखपूर, गाडी क्रमांक 11057 सीएसएमटी-अमृतसर, गाडी क्रमांक 12141 एलटीटी-पाटलीपुत्र या गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आले आहे. तर 7 जून रोजी, गाडी क्रमांक 12811 एलटीटी-हाटिया, गाडी क्रमांक 22177 एलटीटी-वाराणसी, गाडी क्रमांक 02141 सीएसएमटी-नागपूर, गाडी क्रमांक 22538 गोरखपूर-सीएसएमटी या गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आले आहेत.

Comments are closed.