उद्या फॉर्म भरण्याची डेडलाईन, तरीही पत्ते गुलदस्त्यात; भंडारा-गोंदियात महायुती अन् मविआ कोणाला
भंडारा: भंडारा आणि गोंदिया विधानपरिषद निवडणुकीचा नामनिर्देशन फॉर्म भरण्याचा उद्या (सोमवारी, ता १) शेवटचा दिवस आहे. महाविकास आघाडी असो किंवा महायुतीच्या (Vidhan Parishad Election 2026) वतीनं त्यांच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा केलेली नसल्यानं मतदारांमध्ये उमेदवारांबाबत सस्पेन्स वाढलेला आहे. भंडारा-गोंदियाची (Vidhan Parishad Election 2026) जागा महायुतीकडून भाजप आणि महाविकास आघाडीच्या यांच्यावतीनं काँग्रेस लढणार एवढं मात्र निश्चित झालं आहे. भाजपकडून अविनाश ब्राह्मणकर हे संभाव्य उमेदवार म्हणून त्यांचं नाव आलं आहे. तर काँग्रेसकडून गोंदियाचे प्रफुल्ल अग्रवाल यांचे नावं समोर आहे.(Vidhan Parishad Election 2026)
महायुतीकडून लढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि भंडाऱ्याचे सहकार महर्षी सुनील फुंडे हे तयारीत असून वेळप्रसंगी ते भाजपात पक्षप्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. यांच्यासोबत भाजपचे माजी खासदार सुनील मेंढे, प्रकाश बाळबुधे यांनीही उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. काँग्रेस आणि भाजपकडून आज नावांची घोषणा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, नावांबाबत अजूनही क्लिअर झालं नसल्यानं सर्वांचीच उत्कंठा शिगेला पोहोचलेली आहे. जी नावं चर्चेत आहे त्यांच्या व्यतिरिक्त अन्य कुठलं नाव समोर येते का? याबाबतही सध्या चर्चा रंगलेली आहे.(Vidhan Parishad Election 2026)
Vidhan Parishad Election 2026 : अखेर महायुतीचे अंतिम जागावाटप निश्चित
विधान परिषद निवडणुकीसाठी अखेर महायुतीचे अंतिम जागावाटप निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. प्रचंड रस्सीखेच आणि जागांवरील दावे-प्रतिदाव्यानंतर १७ जागांसाठी तिन्ही पक्षांमध्ये एकमत झाल्याची माहिती आहे.अंतिम फॉर्म्युलानुसार भाजप ११, शिवसेना ४ तर राष्ट्रवादी २ जागांवर लढवणार निवडणूक लढवणार असल्याची माहिती आहे. प्रदेश आणि केंद्रातील नेत्यांच्या चर्चेनंतर जागांवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. अतिरिक्त एक जागा पदारात पाडून घेण्यात राष्ट्रवादी यशस्वी तर ७ जागांवर अडून बसलेल्या शिवसेनेला ४ जागांवर मानावे लागणार समाधान मानावे लागणार आहे.
Vidhan Parishad Election 2026 : विधानपरिषद निवडणूकीचा संपूर्ण कार्यक्रम
निवडणुकीची अधिसूचना- 25 मे
अर्ज भरण्याची शेवटची तारीख- 1 जून
उमेदवारी अर्जांची छाननी- 2 जून
अर्ज माघारीची मुदत- 4 जून
मतदान- 18 जून (स.8 ते दु.4)
मतमोजणी- 22 जून
Vidhan Parishad Election 2026 : पुढील मतदारसंघात होऊ शकते निवडणूक
सोलापूर
अहिल्यानगर
ठाणे
जळगाव
सांगली-सातारा
नांदेड
यवतमाळ
पुणे
भंडारा-गोंदिया
रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग
नाशिक
वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली
अमरावती
धाराशिव-लातूर-बीड
परभणी-हिंगोली
छत्रपती संभाजी नगर-जालना
नागपूर
महाराष्ट्र
विधान परिषदेची (Vidhan Parishad) एकूण सदस्यसंख्या 78 आहे. विधान परिषदेत सदस्य कसे निवडले जातात? (Vidhan Parishad )
78 सदस्यांपैकी:
30 – आमदारांकडून निवडले जातात
22- स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून
7- पदवीधर मतदारसंघातून
7- शिक्षक मतदारसंघातून
12- राज्यपाल नियुक्त करतात.
Vidhan Parishad Election 2026 : विधानसभेत कोणाचे संख्याबळ किती?
भाजप- 132 – 1 = 131
शिवसेना (शिंदे गट)- 57
राष्ट्रवादी (अजित पवार गट)- 41 – 1 = 40
काँग्रेस- 16
राष्ट्रवादी (शरद पवार गट)- 10
शिवसेना (ठाकरे गट)- 20
समाजवादी पक्ष- २
जनसुराज्य शक्ती- 2
राष्ट्रीय युवा स्वाभीमान पार्टी- 1
राष्ट्रीय समाज पक्ष- रासप- 1
एमआयएम- 1 जागा
सीपीआय (एम)- 1
पिजन्ट्स अँड वर्कर्स पार्टी ऑफ इँडिया- पीडब्ल्यूपीआय- 1
राजर्षी शाहू विकास आघाडी- 1 (राजेंद्र यड्रावकर)
अपक्ष- 2 (शिवाजी पाटील आणि शरद सोनावणे)
महायुती = 131 + 57 + 40 + 2 + 1+1 + 2= 234 (2 आमदारांचं निधन)
माविया = 16+10+20+2+1 = 49
इतर = 03
एकूण = 286 आमदार
आणखी वाचा
Comments are closed.