गुजरातमध्ये तुफान पाऊस, हवामान खात्याकडून यलो अलर्ट; IPL च्या फायनलआधी क्रिकेटप्रेमींना धडकी भ

RCB vs GT IPL 2026 अहमदाबादवर अंतिम पिवळा इशारा : आज आयपीएल 2026 (IPL 2026) चा अंतिम सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यात रंगणार आहे. मात्र, या हायव्होल्टेज सामन्यापूर्वी क्रिकेटप्रेमींची धाकधूक वाढवणारी एक मोठी अपडेट समोर आली आहे. अहमदाबादमध्ये हवामान खात्याने ‘यलो अलर्ट’ जारी केला असून, पुन्हा एकदा आयपीएल फायनलवर पावसाचे सावट निर्माण झाले आहे. 2023 च्या हंगामातही चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील अंतिम सामन्यात पावसाने असाच मोठा व्यत्यय आणला होता. आता तीन वर्षांनंतर इतिहास पुन्हा स्वतःची पुनरावृत्ती करतोय की काय, अशी भीती चाहत्यांना सतावत आहे.

हवामान खात्याचा अंदाज काय? (Yellow alert over Ahmedabad final)

अहमदाबादमध्ये रविवारी सकाळपासून कडक ऊन पडले असून तापमान 40 अंश सेल्सिअसच्या वर आहे. असे असले तरी, स्थानिक हवामान खात्याने गुजरातच्या काही भागांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवत ‘यलो अलर्ट’ दिला आहे. अ‍ॅक्युवेदरच्या अहवालानुसार, सामन्याच्या वेळेत हवामान उष्ण राहील आणि पावसाची शक्यता कमी आहे; परंतु उत्तर भारतातील बदलत्या हवामानामुळे ऐनवेळी पावसाची एन्ट्री होऊ शकते. शुक्रवारी चंदिगढमधील खराब हवामानामुळे गुजरातच्या संघाला अहमदाबादला पोहोचायला आधीच उशीर झाला होता, त्यामुळे हवामानाचा मूड कधी बदलेल सांगता येत नाही.

सामना रद्द झाला तर विजेता कसा ठरणार? जाणून घ्या नियम

जर आज अहमदाबादमध्ये पावसाने हजेरी लावली, तर सामना थेट रद्द केला जाणार नाही. डिजिटल स्क्रीन आणि मैदानाची पाहणी करून पंच शक्य तितका पूर्ण सामना खेळवण्याचा प्रयत्न करतील. यासाठीचे नियम खालीलप्रमाणे आहेत:

ओव्हर्स कमी केल्या जातील

पाऊस थांबण्यास उशीर झाल्यास दोन्ही बाजूंच्या ओव्हर्स कमी केल्या जातील. निकालासाठी दोन्ही संघांनी किमान 5-5 ओव्हर्स खेळणे बंधनकारक आहे. 5 ओव्हर्सच्या मॅचसाठी कट-ऑफ वेळ रात्री 11:55 वाजेपर्यंत असेल.

राखीव दिवस (Reserve Day)

जर रविवारी पावसामुळे एकही चेंडू टाकता आला नाही, तर हा सामना सोमवार, 1 जून रोजी म्हणजेच ‘रिझर्व्ह डे’ला खेळवला जाईल.

दोन्ही दिवस धुवून निघाले तर आरसीबी ठरणार चॅम्पियन

जर दुर्दैवाने राखीव दिवशीही (सोमवारी) पावसामुळे सामना पूर्ण होऊ शकला नाही, तर लीग स्टेजच्या गुणतालिकेचा (Points Table) आधार घेतला जाईल. नियमानुसार, गुणतालिकेत वरच्या स्थानावर असलेल्या संघाला थेट विजेता घोषित केले जाईल. चालू हंगामात आरसीबी गुणतालिकेत गुजरात टायटन्सपेक्षा वरच्या क्रमांकावर होती, त्यामुळे सामना पूर्णपणे रद्द झाल्यास गुजरात टायटन्सला विजेता घोषित केले जाईल आणि ते दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरतील.

गुजरात आणि आरसीबीसाठी प्रतिष्ठेची लढाई

हार्दिक पंड्याच्या जाण्यानंतर 2024 मध्ये आठव्या क्रमांकावर फेकल्या गेलेल्या गुजरातने 2025 मध्ये प्लेऑफ आणि आता 2026 मध्ये थेट फायनलमध्ये धडक मारत शानदार पुनरागमन केले आहे. दुसरीकडे, गतविजेत्या आरसीबीने यंदा गुजरातला पहिल्या क्वालिफायरसह दोनदा पराभूत केले आहे.

हे ही वाचा –

ASIAN GAMES 2026: सूर्यकुमार यादव, शुभमन गिल OUT, वैभव सूर्यवंशी IN; आशियाई स्पर्धेसाठी BCCI मोठी घोषणा

आणखी वाचा

Comments are closed.