केंद्रीय महामंडळावर नियुक्तीसाठी 20 कोटी 50 लाखांची मागणी; भाजप समन्वयकाची आर्थिक फसवणूक

यवतमाळ क्राईम न्यूज : यवतमाळच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजपचे समन्वयक नितिन भुतडा यांची केंद्र सरकारच्या महामंडळावर नियुक्ती करण्यासाठी 20 कोटी 50 लाख रुपयांची मागणी केल्याचं प्रकरण समोर आलं आहे. या प्रकरणी यवतमाळच्या अवधूतवाडी पोलिसात तिघांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे (Yavatmal Crime News) दाखल करण्यात आले आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. फक्त केंद्रात राज्यमंत्री दर्जाचे पद मिळून देण्यासाठी आर्थिक फसवणूक (Crime News) करणारी टोळी प्रकरणाने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

Yavatmal Crime : स्पाय वायफाय, मेटल क्लॉक बसवून आरोपींची रेकॉर्डिंग, तिघांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे

मिळालेल्या माहितीनुसारभाजपा जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांची पन्नास हजार रुपयांनी फसवणूक केली होती. केंद्रीय राज्यमंत्री पदासाठी 20 कोटी 50 लाख रुपयांची मागणी पैकी टोकन रक्कम म्हणून एक कोटी रुपये मागितले होते. भाजपचे माजी मंत्री मदन येरावार यांच्या कार्यालयात स्पाय वायफाय, मेटल क्लॉक बसवून भुतडा यांनी फसवणूक करणाऱ्या आरोपींची रेकॉर्डिंग केली. या प्रकरणी लौकिक फुलकर, गणेश राठोड आणि विश्वजीत राठोड, हि आरोपींची नावे असून सर्व यवतमाळ येथील रहिवाशी आहे.

Bhandara Crime News : भंडाऱ्याच्या तुमसरात भीषण अपघातात दोघांचा मृत्यू, 7 गंभीर

धान वाहतूक करणारा ट्रक आणि बेलोरो गाडीत समोरासमोर भीषण धडक झाली. या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू तर, ७ जण गंभीर जखमी झाले असून यात दोन बालकांचा समावेश आहे. हा भीषण अपघात रामटेक – तुमसर या महामार्गावरील खापा गावाजवळ घडला. अपघातग्रस्त बोलेरो गाडी ही मध्यप्रदेशातील असून, त्यामधून ११ प्रवासी प्रवास करत होते. हे सर्वजण रामटेक कडून तुमसरमार्गे गोंदियाच्या दिशेनं जात होते. धडक इतकी भीषण होती की, बोलेरो गाडीचा दर्शनी भागाचा पूर्णचक्काचूर झाला. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती. स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तत्परता दाखवत घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमींपैकी एकाची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. सर्व गंभीर जखमींना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Comments are closed.