भाजप 11 जागा लढणार… पुण्यासह कोकणही अजित पवार गटाकडे, सातचा हट्ट धरणाऱ्या शिंदे गटाला चार जागा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

विधान परिषदेच्या 17 जागांसाठी प्रचंड रस्सीखेच, दिल्ली वाऱ्या, दावे-प्रतिदावे केल्यानंतर अखेर महायुतीच्या जागावाटपावर आज एकमत झाले. 17 पैकी सर्वाधिक 11 जागा भारतीय जनता पक्षाकडे आल्या असून पुणे, कोकणची जागा राष्ट्रवादी काँग्रेस तर बऱ्याच ओढाताणीनंतर ठाणे, नाशिकची जागा शिंदे गटाच्या पदरात पडली.

शिंदे गट नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरबरोबरच जळगावच्या जागेसाठी अडून बसला होता. किमान 7 जागा मिळाव्यात यासाठी शिंदे दिल्लीत ठाण मांडून होते. त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेतेही दिल्लीतील भाजप नेत्यांच्या भेटीगाठी घेत होते. भाजपकडून 12 जागांसाठी 48 इच्छुक उमेदवारांची नावे दिल्लीला पाठवली गेली होती. बऱयाच घडामोडींनंतर महायुतीचा फॉर्म्युला अंतिम झाला. 1 जून ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे.

भाजप – सोलापूर, जळगाव, भंडारा-गोंदिया, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, अमरावती, धाराशीव-लातूर-बीड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर – जालना, अहिल्यानगर, सांगली-सातारा, नांदेड

शिंदे गट – ठाणे, नाशिक, परभणी, यवतमाळ

अजित पवार गट – रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग कोकण, पुणे

  • अंतिम फॉर्म्युलानुसार भाजप 11, शिवसेना 4 तर राष्ट्रवादी 2 जागांवर निवडणूक लढवणार आहेत. राष्ट्रवादीला अतिरिक्त एक जागा मिळवण्यात यश आले असले तरी शिंदे गटाला 4 जागांवर समाधान मानावे लागले आहे. छत्रपती संभाजीनगरची जागा घेऊन भाजपने शिंदे गटाला धक्का दिला आहे.

Comments are closed.