पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर भीषण अपघात! दोन अवजड वाहनांचा अक्षरशः चक्काचूर; दोघांचा जागीचं अंत

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघात: पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर दोन अवजड वाहनांचा अतिशय भीषण अपघात (Mumbai-Pune Expressway Accident) झालाहे. या अपघातात दोन्ही वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झालाहे. अपघाताची दाहकता बघता यात दोघांचा जागीच मृत्यू झालाय, तर मागून आलेल्या इर्टीगा गाडीने अपघातग्रस्त (Pune Mumbai Expressway Accident) वाहनाला ठोकर दिली, त्यातील दोघे जखमी झाल्याची माहिती आहे. खालापूर फूड मॉल जवळ पहाटे पाच वाजताच्या सुमारास हा भयानक अपघात झाल्याची माहिती आहे. (पुणे मुंबई मिसिंग लिंक अपघात)

पुणे मुंबई मिसिंग लिंक : भीषण अपघातामुळे मुंबईची मिसिंग लिंक बंद

दरम्यानया भीषण अपघातामुळं मुंबईकडे जाणारा मिसिंग लिंक बंद ठेवण्याची वेळ आली. लोणावळ्यापासून मुंबईकडे जाणाऱ्या मिसिंग लिंकची वाहतूक द्रुतगती मार्गाने आणि जुन्या पुणे-मुंबई महामार्गाने वळवण्यात आली. परिणामी दोन तास वाहतूक विस्कळीत झाली. आता अपघातग्रस्त वाहनं बाजूला घेण्यात आली असून मिसिंग लिंक पुन्हा एकदा वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय. सुदैवाने या अपघाताने मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नाही. फक्त मुंबईपुणे मिसिंग लिंक पुन्हा एकदा अपघातावरून चर्चेत आला आहे.

Bhandara news: भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, 12 जण जखमी

धान वाहतूक करणारा ट्रक आणि बेलोरो गाडीत काल (रविवारी) दुपारी भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यातील खापा गावाजवळ भीषण अपघात झाला. त्यात दोघांचा घटनास्थळीचं मृत्यू झाला. तर, 12 जण जखमी झालेत, त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर नागपूर इथं उपचार करण्यात येतं आहे. हा अपघात इतका भीषण होता की, बेलोरो गाडीचा दर्शनी भाग पूर्णपणे चक्काचूर झाल्यानं मृतदेह त्यात फसला होता. अपघातग्रस्त बोलेरो गाडी ही मध्यप्रदेशातील असून, त्यामधून १४ प्रवासी प्रवास करत होते. हे सर्वजण रामटेककडून तुमसरमार्गे गोंदियाच्या दिशेनं जात होते. हेमलाल वरखडे (५६) आणि भूता सिरियाम (६७) असं मृत व्यक्तींचं नाव असून ते मध्यप्रदेशातील बैतूल येथील आहेत. याप्रकरणी तुमसर पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली आहे.

फक्त राज्यभरात होणार अपघाताचं सत्र हे चिंतेचं कारण मानलं जात असून यावर वेळीच उपाययोजनाही होणं आवश्यक आहे. अशी अभिप्राय आता सर्वसामान्यांमधून उमटत आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Comments are closed.