…तर नाशिक विधानपरिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट, शिवसेनेला जागा सुटली पण भाजप नेत्याच्या उमेदवारी
विधान परिषद निवडणूक 2026: नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या (Nashik Vidhan Parishad Election 2026) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय. महायुतीमधील (Mahayuti) जागावाटपाचा तिढा पूर्णपणे सुटण्याआधीच, भाजप (BJP) नेते आणि नाशिक महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती गणेश गीते (Ganesh Gite) यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. विशेष म्हणजे, गणेश गीते यांनी भाजप पक्षाकडून आणि अपक्ष असे दोन स्वतंत्र उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
Vidhan Parishad Election 2026: सूचक स्वाक्षऱ्या करणाऱ्या नगरसेवकांची प्रदेश स्तरावर दखल
गणेश गीते यांनी भरलेल्या उमेदवारी अर्जावर भाजपच्या स्थानिक नगरसेवकांनी सूचक अनुमोदक म्हणून स्वाक्षऱ्या केल्या आहेत. ही बाब समोर येताच भाजपच्या प्रदेश नेतृत्वाने याची गंभीर दखल घेतली आहे. प्रदेश स्तरावरून थेट नाशिकच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडे याबाबत विचारणा करण्यात आली आहे. “नेमक्या कोणाच्या आदेशानुसार या सूचक आणि अनुमोदक स्वाक्षऱ्या करण्यात आल्या?” असा सवाल प्रदेश पातळीवरून विचारण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
Vidhan Parishad Election 2026: महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे
जागावाटपाच्या सूत्रांनुसार, नाशिकची ही जागा शिवसेना (Shiv Sena) शिंदे गटाला सुटली असून, नरेंद्र दराडे (Narendra Darade) हे महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत. मात्र, गणेश गीते यांनी आपला अर्ज दाखल करून थेट आव्हान उभे केले आहे. गणेश गीते हे मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांचे निकटवर्तीय मानले जातात. अर्ज भरल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना गीते यांनी थेट पक्षश्रेष्ठींचा हवाला दिला होता. ते म्हणाले होते की, “मला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) आणि माझे नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी या जागेसाठी शब्द दिला होता. पक्षाने दिलेल्या याच शब्दामुळे त्यामुळेच मी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.”
Vidhan Parishad Election 2026: भाजपची ‘स्ट्रॅटेजी’ की नगरसेवकांचा अतिउत्साह? सस्पेन्स कायम!
गणेश गीते यांच्या उमेदवारी अर्जावर स्थानिक नगरसेवकांनी केलेल्या स्वाक्षऱ्या हा भाजपचा अंतर्गत डावपेच किंवा राजकीय खेळी आहे, की स्थानिक नगरसेवकांचा केवळ अतिउत्साह, याबाबत सध्या राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लढवले जात आहेत. जर गणेश गीते यांनी आपला अपक्ष अर्ज मागे घेतला नाही, तर या निवडणुकीत मोठा ‘ट्विस्ट’ (Twist) येण्याची शक्यता आहे. कारण, अपक्ष उमेदवाराला भाजपच्याच नगरसेवकांचा छुपा किंवा उघड पाठिंबा आहे, असा अप्रत्यक्ष संदेश जाऊ शकतो. आता अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत हा सस्पेन्स (Suspense) कायम राहणार असून, प्रदेश पातळीवरून स्थानिक पदाधिकारी आणि नगरसेवकांना नेमक्या काय सूचना दिल्या जातात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.