Sanjay Raut On Bjp: नरेंद्र मोदींनी मला तो मुद्दा सांगितल्यास मी भाजपमध्ये जाणार- संजय राऊत

संजय राऊत भाजपवर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी (Vidhan Parishad Election 2026) भाजपकडून 11 उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (सुप्रिया सुळे) यांच्या कन्या रेवती सुळे यांचे होणारे सासरे अरूण लखाणी (Arun Lakhani) यांनाही वर्धा चंद्रपूर गडचिरोली विधान परिषदेसाठी तिकीट जाहीर करण्यात आलं आहे.

सुप्रिया सुळेंचे व्याही अरुण लखाणींना भाजपकडून उमेदवारी जाहीर होताच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अरुण लखाणी हे जन्मजात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आहे. त्यांना उमेदवारी मिळाली यात आश्चर्य काय? हे लखाणी काय काँग्रेसमधून गेलेले नाहीत. लखाणी यांच्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली जाऊ शकते. आता कार्यकर्त्यांनी सुप्रिया सुळेंना प्रश्न विचारावेत, असं संजय राऊत म्हणाले.

नरेंद्र मोदींनी मला तो मुद्दा सांगितल्यास मी भाजपमध्ये जाणार- संजय राऊत- (Sanjay Raut On Bjp)

भाजपचे स्वतःचे काय नाही. पश्चिम बंगालमधील मुख्यमंत्री देखील मूळचे काँग्रेसचे आहे. अनेक ठिकाणी मंत्री हे काँग्रेसचे आहे. भाजप लोकांचे स्वतःचे काय नाही. मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासाचा मुद्दा सांगितला तर मी देखील भाजपमध्ये जाईन, असं संजय राऊतांनी सांगितले. तसेच मला सांगा की मोदींनी काय विकास केला.. मी सांगू शकतो पंडित नेहरूंनी हा विकास केला. मी सांगेन, इंदिरा गांधींनी हा विकास केला. महाराष्ट्र शिवसेनेचे राज्य असताना मनोहर जोशी यांच्या सरकारने काय केलं. बाळासाहेब ठाकरेंनी नेमकं काय केलं, हे मी सांगू शकतो, असंही संजय राऊत म्हणाले. नरेंद्र मोदींनी काय केलं हे जर मला कोणी सांगणार असेल तर मी शांतपणे ते ऐकलं आणि माझं मतपरिवर्तन झालं तर मी मोदींचे भजन करेल, असा मिश्किल टोलाही संजय राऊतांनी लगावला. भाजपवाले एक नंबरचे भंपक आणि खोटारडे लोक आहेत, अशी टीकाही संजय राऊतांनी केली.

भाजपच्या 11 उमेदवारांची यादी- (BJP Candidate List Vidhan Parishad Election 2026)

  1. वर्धा चंद्रपूर गडचिरोली– अरुण लखानी
  2. भंडारागोंदिया– अविनाश ब्राह्मणकर
  3. अमरावती– प्रवीण पोटे
  4. सोलापूर– राजेंद्र राऊत
  5. सांगली सातारा– धैर्यशील कदम
  6. अहिल्यानगर- प्राजक्त तनपुरे
  7. छत्रपती संभाजीनगर-जालना- सुहास शिरसाट
  8. नांदेड – अमर राजूरकर
  9. धाराशिव बीड लातूर– बसवराज पाटील
  10. जळगाव– नंदकिशोर महाजन
  11. नागपूर– राजीव पोतदार

संजय राऊत काय काय म्हणाले?, VIDEO:

संबंधित बातमी:

BJP Shivsena NCP Mahayuti Candidate List Vidhan Parishad Election 2026: शिवसेनेपासून भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसपर्यंत…; विधान परिषदेच्या 17 पैकी 17 उमेदवारांची यादी, एका क्लिकवर

आणखी वाचा

Comments are closed.