गरीब नगर दगडफेकप्रकरणी 20 जणांना अटक
वांद्रे पूर्वेकडील गरीब नगर येथे तोडक कारवाई वेळी पोलिसांवर झालेल्या दगडफेक प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 20 जणांना अटक केली आहे. आणखी 10 ते 15 आरोपींची ओळख पोलिसांनी पटवली असून लवकरच त्यांनाही पडण्यात येईल असे सांगण्यात येते. गरीब नगर येथे अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई झाली होती. त्या वेळी काही माथेफिरू नागरिकांनी तोडक कारवाईला विरोध म्हणून कर्मचारी व पोलिसांवर दगडफेक केली होती. त्यात 10 जण जखमी झाले होते. कारवाईनंतर परिस्थिती पूर्ववत झाल्यावर पोलिसांनी दगडफेक करणाऱ्यांची ओळख पटवून आतापर्यंत 20 जणांना अटक केली. तर आणखी 10 ते 15 आरोपींची ओळख पटविण्यात आली असून लवकरच त्यांनाही पकडण्यात येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात येते.
Comments are closed.