उरणमध्ये दुचाकींची धडक, अपघातात दोघांचा मृत्यू

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याची घटना उरण-मोरा रोडवर आज पहाटे घडली. या भीषण अपघातात दोन्ही दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला. निखिल कुकडे आणि महेश चांदेकर अशी मृतांची नावे आहेत. या अपघातामुळे कुकडे, चांदेकर कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

उरण-मोरा रस्त्यावरील बोरी येथील हरिश्चंद्र गावंड उद्यानासमोर हा भीषण अपघात घडला. या मार्गावरून पहाटे अडीचच्या सुमारास नागावमधील निखिल कुकडे आणि बोरी येथे राहणारा महेश चांदेकर हे दोघे दुचाकीने जात होते. बोरी येथे ते आले असता दोघांचेही दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी समोरासमोर धडकल्या. हा अपघात इतका भीषण होता की यात दोन्ही दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला.

गुन्हा दाखल

अपघाताची माहिती मिळताच उरण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा करून दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले. इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. याप्रकरणी बेदरकारपणे गाडी चालवत मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दोन्ही दुचाकीस्वारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा अधिक तपास पोलीस करत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल काटवाणी यांनी दिली.

Comments are closed.