अनिकेत तटकरेंचा मार्ग होणार सोपा, कोकणातील शिवसेनेचं बंड होणार थंड, जुईली दळवी घेणार माघार
Konkan Vidhanparishad Election : विधान परिषदेच्या (Vidhanparishad) 17 जागांसाठी अर्ज दाखल करण्याचा कालचा अखेरचा दिवस होता. आजपासून अर्जाची छाननी होणार होणार आहे. काही ठिकाणी मित्र पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये तिढा निर्माण झाला आहे. महायुतीमध्ये बंडखोरीचे (Vidhan Parishad Election 2026) प्रमाण जास्त असल्याने या बंडखोरांना उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावण्यासाठी आणि त्यांची मन धरणीसाठी प्रयत्न करावी लागणार आहे. कोकणात देखील शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांच्या कन्या जुईली दळवी यांनी उमेदवारी दाखल केली आहे. मात्र, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुचनेनंतर जुईली दळवी या निवडणुकीतील उमेदवारी अर्ज माघारी घेणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
कोकणातील विधानपरिषदेच्या निवडणुकीतील बंडखोरी शमल्याची माहिती
कोकणातील विधानपरिषदेच्या निवडणुकीतील बंडखोरी शमल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वात एक्सप्रेस टॉवर मधे कोकणातील शिंदेंच्या शिवसेनेच्या 5 ही लोकप्रतिनिधी आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. आमदार महेंद्र दळवी यांच्या कन्या जुईली दळवी यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. कोकणात महायुतीमधून अनिकेत तटकरे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर झाली आहे. महायुतीचा नियम पाळला पाहिजे अशा सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पक्षातील नेत्यांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळं आमदार महेंद्र दळवी आपल्या मुलीचा या निवडणुकीतील अर्ज माघारी घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Mahayuti : बंडखोरांना थंड करण्यासाठी दोन्ही प्रदेशाध्यक्षांमध्ये चर्चा
सुनील तटकरे हे भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणांच्या भेटीला आले होते. यावेळी रायगड या शासकीय निवासस्थानी तटकरे व चव्हाण यांच्यात बराच वेळ भेट झाली. विधानपरिषद निवडणुकीतील बंडखोरीबाबत यावेळी चर्चा झाली. विधान परिषदेच्या 17 जागांवर भाजप व राष्ट्रवादीला बंडखोरीचा फटका बसण्याची शक्यता आहे. बंडखोरांना थंड करण्यासाठी दोन्ही प्रदेशाध्यक्षांमध्ये चर्चा झाली.
Shiv Sena Strength : कोकणात शिवसेनेचे संख्याबळ अधिक
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रतिनिधींच्या संख्याबळाच्या दृष्टीने कोकणात शिवसेनेची ताकद वाढल्याचे दिसत आहे. त्यामुळे ही जागा आपल्या वाट्याला यावी, यासाठी शिवसेनेचे कोकणातील आमदार आग्रही होते. मात्र महायुतीतील जागावाटपाचा ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला गेली आहे. खासदार सुनिल तटकरे यांचे सुपुत्र अनिकेत तटकरे यांनी उमेदवारी मिळाली आहे.
कोकणातील पक्षनिहाय संख्याबळ – एकूण 831
शिवसेना शिंदे गट – 236
भाजप – 151
राष्ट्रवादी – 63
शिवसेना ठाकरे – 55
काँग्रेस – 50
आणखी वाचा
Comments are closed.