येवल्यात आरोग्य विभागाची बोगस डॉक्टरवर कारवाई, 20 ते 25 हजार गोळ्यांसह इंजेक्शनचा साठा जप्त
नाशिक क्राईम न्यूज : नाशिक जिल्ह्यातील येवलामध्ये आरोग्य विभागानं मोठी कारवाई केली आहे. येवल्यात बोगस डॉक्टरवर कारवाई केली आहे. आरोग्य विभागाने घातलेल्या छाप्यामध्ये लेबल नसलेल्या औषधांचा व इंजेक्शन साठा जप्त करण्यात आला आहे. विनापरवानगी वैद्यकीय व्यवसाय सुरू होता. कारवाईनंतर बोगस डॉक्टर नॉट रिचेबल झाला आहे.
नाशिकच्या येवला तालुक्यातील बोकटे येथे गेल्या दहा वर्षांपासून आयुर्वेदिक चिकित्सालयाच्या नावाखाली अलोपथी उपचार करून लेबल नसलेले औषधे रुग्णांना दिली जात असल्याची गुप्त माहिती आरोग्य विभागाला मिळाली होती. त्यानुसार आरोग्य विभागाने घातलेल्या छाप्यामध्ये लेबल नसलेल्या 20 ते 25 हजार गोळ्या, सलाईन , व सिरींज जप्त केल्या असून उपचार करत असलेला ‘ रॉय ‘ नावाचा बोगस डॉक्टर कारवाईनंतर नॉट रीचेबल झाला आहे. दरम्यान, आरोग्य विभागाकडून बोगस दवाखाना सील करण्यात आला असून डॉक्टरची डिग्री तपासणीसाठी पाठवण्यात आली असल्याची माहिती प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. तारू आनंद यांनी दिली आहे. कारवाई झाल्यानंतर डॉक्टर रॉय हा नॉट रिचेबल झाला असून गेल्या दहा वर्षांपासून हा वैद्यकीय व्यवसाय करत असताना आरोग्य विभागाला याची माहिती नसावी का? असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहे.
आणखी वाचा
Comments are closed.