रोहित शर्मासाठी 2027 चा विश्वचषक आव्हानात्मक! दिग्गज खेळाडूचा फिटनेस आणि कामगिरीबद्दल कडक सल्ला
भारतीय संघ आता 2027 च्या विश्वचषकावर लक्ष केंद्रित करत आहे. भारतात झालेल्या 2023 च्या वनडे विश्वचषकात भारताने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती, परंतु रोहित शर्माच्या (former Captain of team india Rohit Sharma’s under captaincy) नेतृत्वाखालील टीम इंडियाला अंतिम सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. आता रोहित शर्मा 2027 चा विश्वचषक खेळणार की नाही, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आगामी स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर एका दिग्गज खेळाडूने रोहितला इशारा दिला आहे.
माजी भारतीय क्रिकेटपटू सबा करीम यांनी रोहित शर्माच्या फिटनेसवर भाष्य करत त्याला मेहनत करण्याचा सल्ला दिला आहे. रोहितच्या फिटनेसबाबत सध्या अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत, त्यावर सबा करीम यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
सबा करीम म्हणाले, मला वाटते की रोहितला खूप मेहनत करावी लागेल. त्याला आपल्या फिटनेसवर आणि फलंदाजीवर विशेष काम करावे लागेल. त्यामुळे, रोहितला संघात स्थान द्यायचे की नाही, हे ठरवण्यासाठी निवडकर्ते पुढील सहा महिने त्याच्या कामगिरीवर बारीक लक्ष ठेवतील.
विराट कोहलीबद्दल बोलताना सबा करीम म्हणाले, विराट कोहलीच्या बाबतीत, मला खात्री आहे की निवडकर्ते पूर्णपणे निश्चिंत आहेत. विराट 2027 च्या विश्वचषक संघाचा नक्कीच भाग असेल, कारण त्याने आपल्या कामगिरीने, फिटनेसने आणि धावांच्या कामगिरीने हे सर्व सिद्ध केले आहे. रोहित शर्माने पूर्वीच्या तुलनेत आपले वजन खूप कमी केले आहे. आयपीएल 2026 मध्येही त्याच्या बॅटमधून काही दमदार खेळी पाहायला मिळाल्या होत्या. रोहितने 9 सामन्यांच्या 9 डावांत 35.37 च्या सरासरीने 283 धावा केल्या आहेत. यात त्याने 2 अर्धशतके ठोकली असून 84 धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी राहिली आहे.
रोहित शर्मा सध्या अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी सज्ज झाला आहे. 12 जूनपासून या मालिकेची सुरुवात होत असून, रोहितसाठी ही मालिका एक अग्निपरीक्षा मानली जात आहे.
Comments are closed.