लालू यादव यांची झेड प्लस सुरक्षा काढून घेतली.

पाटणा :

बिहार सरकारने राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव आणि माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांना प्राप्त ‘झेड प्लस’ श्रेणीची सुरक्षा मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. तर माजी आमदार तेजप्रताप यादव यांची ‘वाय’ श्रेणीची सुरक्षाही हटविण्यात आली आहे. राज्य सुरक्षा समितीच्या बैठकीत करण्यात आलेल्या शिफारसींच्या आधारावर हा निर्णय घेण्यात आल्याचे राज्य सरकारचे सांगणे आहे.

Comments are closed.