टीम इंडियामधून 11 खेळाडू OUT, बीसीसीआयने भाकरी नव्हे अख्खा तवाच फिरवला! एशियन गेम्ससाठी संघ जाह
आशियाई खेळ 2026 साठी भारतीय संघ: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आगामी एशियन गेम्स 2026 (आशियाई खेळ) साठी भारतीय संघाची घोषणा केली असून, यावेळी निवड समितीने अत्यंत धक्कादायक आणि मोठे निर्णय घेतले आहेत. जपानमधील आयची-नागोया (Aichi-Nagoya) येथे होणाऱ्या या स्पर्धेसाठी बीसीसीआयने कोणताही दुय्यम संघ न पाठवता आपला मुख्य आणि पूर्ण ताकदीचा (Full-Strength) संघ मैदानात उतरवला आहे. या निवडीदरम्यान निवड समितीने कठोर पाऊल उचलत मागील वेळी एशियन गेम्स जिंकून देणाऱ्या कर्णधारासह तब्बल 10 खेळाडूंना थेट बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
येथे एक नजर आहे #TeamIndiaया सप्टेंबरमध्ये जपानमध्ये 2026 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठीचा संघ 👏#AsianGames pic.twitter.com/euMfmhWEcN
— BCCI (@BCCI) 6 जून 2026
श्रेयस अय्यर टीम इंडियाचा कर्णधार
मुंबईत झालेल्या निवड समितीच्या बैठकीत अनेक मोठे उलटफेर पाहायला मिळाले. टी-20 विश्वचषक जिंकणारा स्टार फलंदाज आणि कर्णधार सूर्यकुमार यादव याला संघातून डच्चू देण्यात आला आहे. त्याच्या जागी आयपीएल 2024 आणि 2025 मध्ये लागोपाठ आपल्या संघाला फायनलमध्ये पोहोचवणाऱ्या श्रेयस अय्यरला भारतीय टी-20 संघाचा नवा कर्णधार घोषित करण्यात आले आहे. श्रेयसच्या सातत्यपूर्ण कामगिरीचे फळ त्याला कर्णधारपदाच्या रूपाने मिळाले आहे. तर दुसरीकडे, युवा फलंदाज तिलक वर्मा याच्याकडे उपकर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.
सादर करत आहे #TeamIndiaचा सर्वात नवीन T20I कर्णधार 🇮🇳
श्रेयस अय्यरने खेळाच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये सुकाणू हाती घेतल्याने त्याचे अभिनंदन 👏@श्रेयसआयर१५ pic.twitter.com/frfAXAOkTA
— BCCI (@BCCI) 6 जून 2026
2022 च्या तुलनेत संपूर्ण संघ बदलला (India Squad for Asian Games 2026 Update)
चार वर्षांपूर्वी (2022 च्या हँगझू एशियन गेम्समध्ये) ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली भारताने तरुण खेळाडूंचा भरणा असलेला संघ पाठवला होता. मात्र, यंदा बीसीसीआयने भाकरी नव्हे तर अख्खा तवाच फिरवला आहे. गेल्या वेळच्या संघातील तब्बल 11 खेळाडूंना बाहेर करण्यात आले असून, यंदा थेट टी-20 विश्वचषक जिंकणाऱ्या 10 मुख्य खेळाडूंचा संघात समावेश केला आहे. जसप्रीत बुमराह, संजू सॅमसन, अक्षर पटेल आणि अर्शदीप सिंग यांसारखे दिग्गज खेळाडू या संघात खेळताना दिसतील.
संघामध्ये फक्त 5 खेळाडू असे आहेत जे विश्वचषक विजेत्या संघाचा भाग नव्हते. यामध्ये श्रेयस अय्यर, नितीश रेड्डी, रवी बिश्नोई, हर्षित राणा आणि युवा खळबळजनक खेळाडू वैभव सूर्यवंशी यांचा समावेश आहे. हर्षित राणा दुखापतीमुळे विश्वचषकाला मुकला होता, तर वैभव सूर्यवंशीने आपल्या धडाकेबाज कामगिरीच्या जोरावर संघात स्थान निश्चित केले आहे.
आशियाई खेळ 2026 साठी भारताचा संघ
श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन, शिवम दुबे, तिलक वर्मा (उपकर्णधार), नितीश रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, वैभव सूर्यवंशी आणि जसप्रीत बुमराह.
इंडियन असोसिएशन ऑफ एशियन गेम्स 2022
ऋतुराज गायकवाड (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, राहुल त्रिपाठी, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, आवेश खान, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, शिवम मावी, शिवम दुबे, प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर)
हे ही वाचा –
Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल
Comments are closed.