‘माझ्याकडे तुझे फोटो, पळून आली नाहीस तर फोटो व्हायरल करीन’, अल्पवयीन मुलीला गल्लीत एकटे गाठले अ
बीड क्राईम न्यूज : बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातून महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीला (Minor Girl) “माझ्याकडे तुझे फोटो आहेत, तू पळून आली नाहीस तर ते सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल करीन,” अशी धमकी देत तिचा विनयभंग करण्यात आला आहे. या त्रासाला कंटाळून पीडितेने अखेर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार (Complaint) नोंदवली. या तक्रारीवरून परळी पोलिसांनी (Parli Police) आरोपी कृष्णा बाबूराव शिंदे याला अटक (Arrest) केली आहे.
Beed Crime News: दूध आणायला गेलेल्या पीडितेचा केला पाठलाग
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी नेहमीप्रमाणे घरातून दूध आणण्यासाठी बाहेर पडली होती. ती रस्त्याने जात असताना आरोपी कृष्णा शिंदे याने तिचा पाठलाग केला. गल्लीत ती एकटी असल्याचे पाहून आरोपीने तिला गाठले आणि तिचा रस्ता अडवून विनयभंग केला.
Beed Crime News: लग्नासाठी दबाव आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी
आरोपीने पीडितेचा केवळ विनयभंगच केला नाही, तर तिच्यावर मानसिक दबावही टाकला. “आपण दोघे पळून जाऊन लग्न करू, तू पळून जाण्यासाठी तयार राहा,” असे तो पीडितेला म्हणाला. जेव्हा पीडितेने या गोष्टीला नकार दिला, तेव्हा आरोपीने तिला ब्लॅकमेल (Blackmail) करण्यास सुरुवात केली. “माझ्याकडे तुझे फोटो आहेत, तू जर माझ्यासोबत पळून आली नाहीस तर हे सर्व फोटो मी सोशल मीडियावर व्हायरल करून तुझी बदनामी करीन,” अशी थेट धमकीच त्याने दिली.
Beed Crime News: आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
आरोपी कृष्णा शिंदे याच्या त्रासाला आणि धमक्यांना कंटाळून अखेर पीडित मुलीने आपल्या कुटुंबाला घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर तात्काळ परळी पोलीस ठाण्यात (Parli Police Station) आरोपीविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला. पोलिसांनी गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून तातडीने चक्र फिरवली आणि आरोपी कृष्णा बाबूराव शिंदे याला बेड्या ठोकल्या. या घटनेचा पुढील अधिक तपास परळी पोलीस करत आहेत.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
इतर महत्त्वाच्या बातम्या
Pune Hospital Bomb Case:यूट्यूब पाहून बनवला बॉम्ब;हॉस्पिटलला लुटण्याचा होता प्लॅन,पोलिसांचा मोठा खुलासा!
Comments are closed.