वाढत्या Breast Cancerला जीवनशैली जबाबदार? या सवयी वेळीच बदला, नाहीतर…

सध्याची धावती जीवनशैली आणि चुकीच्या सवयींमुळे वयाच्या तिशीच्या आतच तरुण महिलांमध्येही ब्रेस्ट कॅन्सर होण्याचे प्रमाण वाढत आहे. पूर्वी हा आजार चाळीशी किंवा पन्नाशीनंतर अधिक प्रमाणात आढळायचा, पण आता कमी वयातच याचे निदान होत आहे. तरुण वयात हा धोका वाढण्यामागे प्रामुख्याने आपल्या दैनंदिन सवयी कारणीभूत आहेत. जर तुम्हाला या धोक्यापासून स्वतःचा बचाव करायचा असेल, तर कोणत्या सवयी आजच बदलणे गरजेचे आहे जाणून घेऊयात.

अयोग्य आहार

सध्या घड्याळ्याच्या काट्यावर जग धावत असल्याने पॅकबंद अन्न, जंक फूड, मैद्याचे पदार्थ आणि अतिप्रमाणात गोड खाल्लं जात आहेत. परिणामी शरीरात एस्ट्रोजेन या हार्मोचा स्तर अनियंत्रित होत असून ब्रेस्ट कॅन्सरच्या वाढीस कारणीभूत ठरत आहेत.

काय करावे?

आहारात हिरव्या पालेभाज्या, ताजी फळे, कडधान्ये आणि फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करावा.

हेही वाचा – Menopause Tips : मेनोपॉजनंतरही राहा फिट आणि आनंदी

बैठी जीवनशैली

तासनतास कॉम्प्युटरसमोर बसून काम करणे आणि शारीरिक हालचाली कमी असण्यामुळे शरीरातील चरबी वाढतेय. वाढलेले वजन आणि शरीरातील अतिरिक्त फॅट्स कॅन्सरच्या पेशी वाढवण्यास मदत करतात.

काय करावे?

दिवसातून किमान 30 मिनिटे वेगाने चालणे, योगासने, किंवा कोणताही व्यायाम करण्याची सवय लावावी.

अपूरी झोप

रात्री उशिरापर्यंत जागणे आणि पुरेशी झोप न घेणे यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते आणि हार्मोन्सचे संतुलन बिघडते.

काय करावे?

तणाव कमी करण्यासाठी ध्यान करावे आणि रोज 7 ते 8 तासांची शांत झोप घ्यावी.

मद्यपान आणि धूम्रपान

तरुण महिलांमध्ये मद्यपान आणि स्मोकिंगचे प्रमाण वाढले आहे. अल्कोहोलचे सेवन थेट स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढवण्यास कारणीभूत ठरत आहे.

काय करावे?

व्यसनांपासून पूर्णपणे दूर राहावे.

गर्भनिरोधक गोळ्यांचा अतिवापर

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय किंवा दीर्घकाळासाठी गर्भनिरोधक गोळ्यांचे सतत सेवन केल्याने शरीरातील हार्मोन्सचे नैसर्गिक चक्र पूर्णपणे बिघडून जाते. यामुळे ब्रेस्ट कॅन्सर धोका वाढतो.

काय करावे?

कोणतीही हार्मोनल औषधे घेण्यापूर्वी स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या.

तज्ज्ञांचा सल्ला –

विशीनंतर प्रत्येक महिलेने महिन्यातून एकदा स्वतःच स्वतःची तपासणी केली पाहिजे. स्तनात किंवा काखेत एखादी गाठ जाणवणे, स्तनाग्र आत खेचले जाणे, किंवा स्तनाच्या त्वचेमध्ये बदल दिसल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा. सुरुवातीला निदान झाल्यास हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो.

हेही वाचा – एका महिलेने दिला तब्बल 69 मुलांना जन्म, पण खरंच जास्तीत जास्त किती मुले होऊ शकतात?

Comments are closed.