एकनाथ शिंदेचं पुन्हा मुख्यमंत्री होणार!, नरेंद्र भोंडेकरांच्या विधानानं महायुतीत पुन्हा राजकीय

भंडारा न्यूज : महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर महायुतीत मुख्यमंत्रीपदावरून जोरदार ठिणगी संगीत स्केलची पाचवी नोंदडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण भंडाऱ्याचे शिंदे शिवसेना (Shivsena) आमदार नरेंद्र भोंडेकर (Narendra Bhondekar) यांनी थेट आणि अत्यंत आक्रमक विधान करत, “एकनाथ शिंदे यांनाच पुन्हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनवणार,” असा निर्धार व्यक्त केला आहे. भंडाऱ्यात (Bhandara News) शिवसेना, प्रहार कार्यकर्ता आणि पदाधिकारी मेळावा होता. यावेळी शिवसेना नेते आमदार बच्चू कडू त्यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आमदार भोंडेकरांनी हा निर्धार व्यक्त केलाहे.

Shivsena : मिशन विदर्भ, 62 पैकी 30 जागांवर दावा, आमदार भोंडेकरांच्या विधानानं राजकीय वर्तुळात भूकंप!

दरम्यानआमदार भोंडेकर एवढ्यावरचं थांबले नाहीत, तर त्यांनी महायुतीतील अंतर्गत धुसफूसही चव्हाट्यावर आणली आहे. “आम्ही आधी एकटे भांडत होतो, अनेक नेते मॅनेज झाले होते. पण आता दोन नाही तर, आम्ही 11 झालो आहोत,” असं म्हणत त्यांनी विरोधकांवर आणि अंतर्गत राजकीय समीकरणांवर निशाणा साधला. पूर्व आणि पश्चिम विदर्भातील 62 विधानसभा जागांपैकी किमान 30 जागा जिंकून आणायच्या आहेत. आपल्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री व्हावा, हे प्रत्येक कार्यकर्त्याचं स्वप्न असतं आणि तो आमचा अधिकार आहे. आमचं एकच स्वप्न आणि एकच संकल्प आहे, एकनाथ शिंदे साहेबांना पुन्हा मुख्यमंत्री बनवणं!” असेही ते म्हणाले. भोंडेकरांच्या या थेट दाव्यामुळे आता महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवरून नवीन वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.

Comments are closed.