कुठलीही चर्चा नसताना राज्यसभेची उमेदवारी मिळाली; राजेंद्र जैन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले.
राजेंद्र जैन राज्यसभा राष्ट्रवादीचे राजकारण: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP Politics) सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. राज्यसभेसाठी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या नावाची जोरदार चर्चा असताना पक्षानं राजेंद्र जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. देवगिरी निवासस्थानी झालेल्या बैठकीत विविध नावांवर चर्चा करण्यात आली. अमरसिंह पंडित हे देखील राज्यसभेसाठी इच्छुक होते. मात्र अखेर राजेंद्र जैन (Rajendra Jain) यांची राष्ट्रवादीकडून अधिकृत उमेदवार म्हणून निवड करण्यात आली आहे. दरम्यान, राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्यामुळे छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चांना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी फेटाळलं आहे. भुजबळ नाराज नसून पक्षाच्या निर्णयासोबत असल्याचं सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलं.
राजेंद्र जैन काय म्हणाले? (Rajendra Jain On Rajya Sabha Nomination)
मी मध्यवर्ती सहकारी बँकेत 19 वर्षांपासून आहे. माझ्यावर पक्षाने जी जबाबदारी दिलेली आहे. विदर्भात एक चांगल्या पद्धतीने काम करून आणि आदरणीय अजितदादा पवार यांचे स्वप्न जे आहे त्या पद्धतीने मी आज काम कार्यकर्ता म्हणून काम केलेले आहे. त्या पद्धतीने मी काम करणार. सर्व माझे प्रमुख नेते आणि अजितदादा यांचा माझ्यावर आशीर्वाद आहे. जी माझी काम करण्याची पद्धत आहे एक सामान्य कार्यकर्त्याला सर्व नेत्यांनी आशीर्वाद दिला आहे, त्यावर मी खरा उतरणार असल्याची प्रतिक्रिया राजेंद्र जैन यांनी दिली. माझे वरिष्ठ नेते आणि माझ्या वडिलांसारखे आहेत आमच्या पक्षात नाराजी वगैरे काही राहत नाही. ते माझे वडिलांप्रमाणे आहेत त्यांचा आशीर्वाद माझ्यावर आहे. 15 वर्षात त्यांनी मला अनेकदा आशीर्वाद दिलेला आहे. आम्ही सर्वजण एक संघ आहोत. कोणताही शब्द नाही. फक्त पक्षाचं काम केलं एकनिष्ठ आणि इमानदारीने आज त्याचं फळ मिळालं, असं राजेंद्र जैन म्हणाले.
कोण आहेत राजेंद्र जैन? (Who Is Rajendra Jain)
राजेंद्र जैन हे पूर्व विदर्भातील, विशेषतः गोंदिया जिल्ह्यातील एक ज्येष्ठ आणि वजनदार राजकारणी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विदर्भातील एक प्रमुख नेते म्हणून त्यांची ओळख आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांचे अत्यंत विश्वासू सहकारी आणि एकेकाळचे स्वीय सहाय्यक (PA) म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत काम करत असतानाच त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सक्रिय वावर आणि प्रभाव वाढत गेला. विधान परिषद सदस्य (माजी आमदार): राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांच्या पक्षकार्याची दखल घेत त्यांना भंडारा–गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून महाराष्ट्र विधान परिषदेवर पाठवले होते. 2016 मध्ये झालेल्या विधान परिषद निवडणुकीत त्यांचा भारतीय जनता पक्षाचे उमेदवार परिणय फुके यांच्याकडून पराभव झाला होता.
राज्यसभेच्या निवडणुकांचे संपूर्ण वेळापत्रक (Rajya Sabha Election 2026)
- नामांकन दाखल करण्याची अंतिम तारीख (Last Date for Nomination): 8 जून 2026
- नामांकनांची छाननी (Scrutiny of Nominations): 9 जून 2026
- उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख (Last Date for Withdrawal): 11 जून 2026
- मतदानाची तारीख: १८ जून २०२६ (सकाळी ९ ते दुपारी ४)
- मतमोजणी व निकाल (Counting of Votes): 18 जून 2026 (सायंकाळी 5 वाजेपासून)
संबंधित बातमी:
Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल
Comments are closed.