पोलिसांच्या माध्यमातून उमेदवारांवर प्रेशर ,सत्ताधाऱ्यांचा बहुमताचा माज मतदार उतरवतील : पटोले

नाना पटोले बातम्या: सत्ताधाऱ्यांनी पोलिसांच्या माध्यमातून आमच्या उमेदवारांवर प्रेशर आणल्याचा आरोप काँग्रेस नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे. सत्ताधाऱ्यांचा बहुमताचा माज मतदार उतरवतील, असेही पटोले म्हणाले. विरोधकांकडं संख्याबळ जास्त असलं तरी, ही निवडणूक विचारांची आहे. सत्ताधाऱ्यांच्या बहुमताचा माज विधान परिषद निवडणुकीत मतदारचं उतरवतील. खोटं बोलून सत्ता मिळवली आणि देश लुटण्याचा काम करत आहेत, असा घणाघात नाना पटोले यांनी सत्ताधारी भाजपवर केला आहे.

राऊतांनी अनेक वर्षांनी चांगले विचार मांडले, मी त्यांचे धन्यवाद मानतो

एबीपी माझाला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते. या सरकारनं जे पाप करून ठेवलंय, ते फेडण्याचा हा प्रसंग असल्याचा दावाही पटोले यांनी यावेळी केला. भंडारागोंदिया विधान परिषद निवडणुकीचा अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशी आमच्या उमेदवारावर दबाव टाकण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी पोलिसांचा वापर केला. उमेदवाराच्या घराबाहेर 150 पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. इथे जर एवढा दबाव असेल, तर राज्यात काय परिस्थिती असेल? असा सवाल पटोलेंनी उपस्थित केला. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सर्वांनी काँग्रेसच्या नेतृत्वात एकत्र यावं आणि शरद पवारांनी पुढाकार घ्यावा, या संजय राऊतांच्या वक्तव्यावर बोलताना, “राऊतांनी अनेक वर्षांनी चांगले विचार मांडले, मी त्यांचे धन्यवाद मानतो,” असा टोला कम कौतुक पटोलेंनी केलं. स्वातंत्र्यात आणि देशाच्या जडणघडणीत ज्यांचे योगदान नाही, ते केवळ खोटं बोलून देश लुटण्याचं आणि संविधान संपवण्याचं काम करत असल्याचा आरोप त्यांनी भाजपवर केला. या अन्यायाविरोधात केवळ काँग्रेसच लढू शकते, त्यामुळे लोकशाही आणि विचार टिकवण्यासाठी सर्वांनी काँग्रेससोबत यावे, असे आवाहन पटोले यांनी विरोधकांना केलं.

महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांचा विजय सुखकर

सातारा सांगली विधान परिषद निवडणुकीचे महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दरे गावी रात्री जाऊन भेट घेतली. या दोघांमध्ये जवळपास 15 ते 20 मिनिटं चर्चा झाली, यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीमुळे तयार झालेली शिवसेनेची  नाराजी आता दूर होणार अशी चर्चा या भेटीमुळे सध्या सुरू झाल्याचे पाहायला मिळतय. धैर्यशील कदम यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतलेली ही भेट अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचं मानलं जाते यामुळे महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांचा विजय सुखकर झाला आहे अशी सुद्धा चर्चा सध्या पाहायला मिळते

Comments are closed.