तुकाराम मुंडेंच्या आदेशानं राज्यभरात मोठी कारवाई! शेगावमधील प्रसिद्ध कचोरी सेंटरवर ‘एफडीए’चा छा

बुलढाणा : शेगाव येथील प्रसिद्ध कचोरी (Shegaon Kachori) सेंटरवर बुलढाणा अन्न आणि औषध प्रशासनाने छापा टाकल्याची माहिती आहे. कचोरी बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कच्च्या मालाचे नमुने अन्न आणि औषध प्रशासनाने घेतले आहेत. भेसळ युक्त पदार्थ आढळल्यास अन्न आणि औषध प्रशासन निश्चितपणे कारवाई करणार असल्याची माहिती समोर आली आहे. शेगाव येथील प्रसिद्ध कचोरी सेंटरवर बुलढाणा अन्न आणि औषध प्रशासनाने छापा टाकून या कचोरी सेंटर वरील कचोरी बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कच्च्या मालाचे नमुने तपासनीसाठी घेतले.(Shegaon Kachori)

अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशाने राज्यभर भेसळयुक्त खाद्यपदार्थांची तपासणी करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार शेगाव येथील कचोरी ही प्रसिद्ध आहे व शेगाव येथे आल्यानंतर लाखो भाविक ही कचोरी खातात. मात्र ही कचोरी कशी बनवल्या जाते, त्यासाठी कोणता कच्चामाल वापरला जातो? हे तपासण्यासाठी काल (गुरूवारी, ता ११) सायंकाळी अचानक अन्न व औषधी प्रशासनाचे निरीक्षक गुलाबसिंग वसावे यांच्या नेतृत्वात अचानक छापा टाकून कचोरी बनवण्यासाठीचे साहित्य व त्याचे नमुने घेण्यात आले, तपासणीनंतर या नमुन्यात जर भेसळ आढळून आली. तर शेगाव कचोरी सेंटरवर कारवाई करण्यात येईल असंही अन्न आणि औषध प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.(Shegaon Kachori)

Mulund News: अन्न व औषध प्रशासनाची मुलुंडमध्ये मोठी कार्यवाही

अन्न व औषध प्रशासनाची मुलुंडमध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे, ‘गुप्ता चणा भंडार’ येथे गंभीर अस्वच्छता व विना लेबल अन्नपदार्थ आढळल्याने साठा जप्त करण्यात आला असून व्यवसाय बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशानुसार मुंबईमधील बेकायदेशीर आणि मानकांचे उल्लंघन करणाऱ्या अन्न व्यवसायिकांवर कार्यवाहीची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत या पथकाद्वारे मुलुंड येथील “गुप्ता चणा भंडार “मुलुंड वेस्ट या पेढीची प्रत्यक्ष तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान सदर पेढीमध्ये अत्यंत अस्वच्छ आणि आरोग्याला घातक (Unhygienic Conditions) परिस्थिती आढळून आली. तसेच, पेढीमध्ये उत्पादित व विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या विविध अन्नपदार्थाच्या पाकिटांवर उत्पादक, निर्मिती दिनांक किंवा मुदत संपल्याचा दिनांक (Expiry Date) असा कोणताही कायदेशीर लेबल मजकूर नव्हता (Without Label).

सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याशी खेळ खेळणाऱ्या या गंभीर बाबींची तात्काळ दखल घेत, अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी संबंधित पेढीतील एकूण ११४.२ किलो वजनाचा अन्नपदार्थांचा साठा, ज्याची अंदाजे किंमत रु. ८,२९०/- आहे, तो कायदेशीररित्या जप्त केला आहे.

पाणीपुरी सुखी
बारीक शेव
शेवपुरी खुश
चणा भाजलेला
फुगलेला भात
हिरवे वाटाणे साठा (संशयास्पद रंगयुक्त) हे सगळे पदार्थ जप्त करण्यात आली असून कारवाई करण्यात आली आहे.

Medical Association : कोणत्याही मेडिकलवर औषध वितरणासाठी फक्त रजिस्टर फार्मासिस्टच असावा

मेडिकल म्हणजे किराणा दुकान नाही की कोणीही औषध द्यावे; औषधाची, आजाराची माहिती असलेला माणूसच औषध वितरणासाठी असावा, त्यासाठी कायद्यातील तरतुदींची काटेकोरपणे अंमलबजावणी करा, इंडियन मेडिकल असोसिएशनने आयुक्त तुकाराम मुंडेंकडे ही मागणी केली आहे. मेडिकलचं लायसन भाड्याने देण्याचे प्रकारही थांबायला हवेत; मेडिकलमध्ये लायसन डकवलेल असत मात्र ते कोणाचे हे तपासायला हवं. मेडिकलवर औषध वितरणासाठी रजिस्टर फार्मासिस्टच असावा ही कायद्यात तरतूद आहे मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे या गोष्टीकडे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी लक्ष घालावं अशी मागणी इंडियन फार्मिस्ट असोसिएशन कडून करण्यात आली. कोणत्याही मेडिकलमध्ये लायसन डकवलेलं दिसतं मात्र ते कोणाचे आहे हे तपासायला हवं. लायसन भाड्याने देण्याचे प्रकार थांबायला हवेत अशी मागणी करण्यात आली. मेडिकल दुकान म्हणजे किराणा दुकान नाही की कोणीही औषध वाटप करावं. डिप्लोमा धारक माणूसच योग्य पद्धतीने औषध वाटप करू शकतो त्याला आजाराची औषधाची माहिती असते. शिवाय रुग्णांचं समुपदेशनही तो करू शकतो. त्यामुळे कायद्यात असलेल्या तरतुदीची अंमलबजावणी व्हावी अशी मागणी करण्यात आली.

Comments are closed.