लातूरच्या शेतकऱ्याला सरकारने आजारी बैल दिला, प्रेस कॉन्फरन्समध्ये प्रश्न विचारताच फडणवीसांची ऑ
लातूर : निसर्गाच्या अवकृपेने लातुरमधील गरीब शेतमजूर कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. लातुरमधील देवणी तालुक्यातील बोंबळी गावातील काशिनाथ गायकवाड यांचा बैल वादळी पावसादरम्यान वीज पडून मृत्युमुखी पडला. ऐन पेरणीच्या हंगामात शेतीसाठीचा एकमेव आधार गमावल्याने कुटुंबासमोर मोठे आर्थिक संकट आले, गायकवाड यांच्या पत्नीने पुढाकार घेत थेट जू आपल्या खांद्यावर घेतले आणि शेतीची कामे सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लातूरच्या शेतकऱ्याच्या मदतीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धावले. मुख्यमंत्र्यांच्या फोननंतर जिल्हाधिकाऱ्यांनी त्या शेतकऱ्याला बैल उपलब्ध करुन दिला. स्थानिक गोशाळेतून शेतकऱ्याला बैल दिला असल्याची माहिती समोर आली आहे.(Devendra Fadnavis Helps Latur Farmer) पण सरकारच्या मदतीने मिळालेला तो बैल दोनच दिवसांत शेतातील मशागती दरम्यान खाली बसला. पशुवैद्यकीय तपासणीत तो आजारी असल्याचे निष्पन्न झाले. परिणामी मदत मिळण्याऐवजी शेतकऱ्यावर आता त्या बैलाच्या उपचाराचा खर्च करण्याची वेळ आली आहे अशी माहिती समोर आली आहे. त्यावरती आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य करत नेमकं काय घडलं आणि आता कोणते आदेश देण्यात आले आहेत, त्याबाबत भाष्य केलं आहे.(Devendra Fadnavis)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लातूरची बातमी मन हेलावणारी होती, शेतकऱ्याने त्या शेतीचे काम बटाईवर काम त्यांनी घेतलं होतं, त्याचदरम्यान वीज पडून त्यांच्या बैलाचा मृत्यू झाला, त्यानंतर पत्नीला जुंपल्याने सर्वांनाच वाईट वाटलं, त्यावेळी त्यांना दुसरा बैल देण्यात आला होता, त्यानंतर आम्हाला बातमी कळली दिलेला बैल योग्य नाही, ही माहिती समजताच लातूर जिल्हाधिकारी यांना निर्देश दिलेत योग्य तो बैल त्यांना घेऊन द्यावा, अशी माहिती फडणवीसांनी दिली आहे.(Devendra Fadnavis)
Devendra Fadnavis: पक्ष विलीनीकरणाच्या चर्चेवर फडणवीसांची प्रतिक्रिया
सध्या देशभरात आणि राज्यात चाललेल्या राजकीय पक्षांच्या विलीनीकरणाच्या चर्चेवरती बोलताना देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं की, तुम्ही सर्व विलिनीकरणावर चर्चा सुरू करता. पण हरकत नाही. पहिल्यांदा तर मी तुम्हाला सांगतो की हे पक्ष जे तुम्हाला दिसत आहेत. या पक्षाचे नेते इतके हुशार आहेत की बुडत्या बोटीमध्ये ते पाय ठेवणार नाहीत. काँग्रेस हे बुडतं जहाज आहे. ते या बुडत्या जहाजात पाय ठेवतील असं मला वाटत नाही. तथापि, राजकारणात अतिशोयक्तीपूर्ण बोलायचं नसतं. मी तुम्हाला सांगतो, त्यांनी जर पाय ठेवला तर त्याचा आम्हाला फायदा आहे, आम्हाला नुकसान नाही. कारण आम्हाला अधिकची पॉलिटिकल स्पेस ही त्याच्यामुळे उपलब्ध होते. जेवढं विरोधी पक्ष मागे हटेल तेवढी अतिरिक्त जागा भारतीय जनता पक्षाला मिळेल. त्यामुळे या घडामोडींवर आमची कुठलीही प्रतिक्रिया नाही. आम्ही केवळ बघतो आहोत, वेट अँड वॉच, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
Devendra Fadnavis: एल निनो आणि दुष्काळाच्या अनुषंगाने फडणवीस म्हणाले….
एल निनोसंदर्भात आपण तयारी करत आहोत. राज्यावर त्याचा परिणाम होईल आणि टास्कफोर्स आपण तयार केला. जलसंधारणावर आपण भर दिला आहे. पाऊस कमी पडण्याची शक्यता आहे, पण आपण मार्ग काढू. राज्य सरकारच्या आधारे पेरणी केली तर दुबार पेरणीची वेळ येणार नाही. शेतकऱ्यांनी संयम ठेवावा. ॲडव्हायजरीकडे लक्ष द्यावे. क्राॅपिॅग पॅटर्न जनरेशनल काम आहे. वाढ उपलब्ध करुन देणं मार्केट तयार करावं लागतं हे काम आपण सुरु केलं आहे, डाळी आहेत, त्यासंदर्भीत गोष्टी आयात कराव्या लागतात. मक्यापासून इथेनॉल तयार करत आहोत. कापूस सोयाबीनच्या अवतीभवती गोष्टी फिरत आहे, अशी माहिती देखील फडणवीसांनी दिली आहे.
latur Farmer: लातूर बैलाचं प्रकरण काय?
लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील बोंबळी येथील शेतकरी काशिनाथ गायकवाड यांचा एक बैल वीज कोसळून मृत्युमुखी पडला. त्यानंतर पत्नीला औताला जुंपून नांगरणी करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि राज्यभरातून हळहळ व्यक्त करण्यात आली. घटनेची दखल घेत पशुसंवर्धन विभागाने १० जून रोजी तातडीने मदत म्हणून एक बैल उपलब्ध करून दिला. मात्र मदतीसाठी दिलेला हा बैल दोनच दिवसांत शेतातील मशागतीदरम्यान खाली बसला. पशुवैद्यकीय तपासणीत तो आजारी असल्याचे निष्पन्न झाले. परिणामी मदत मिळण्याऐवजी शेतकऱ्यावर आता त्या बैलाच्या उपचाराचा खर्च करण्याची वेळ आली आहे. यामुळे प्रशासनाने नेमका कसा आणि कोणता बैल दिला, त्याची आरोग्य तपासणी झाली होती का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तात्काळ मदतीच्या नावाखाली गोशाळेतील आजारी बैल शेतकऱ्याच्या गळ्यात मारल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. एका बाजूला शेतकरी संकटात असताना त्याला जोडीला साजेसा आणि कामासाठी सक्षम बैल उपलब्ध करून देण्याऐवजी कामचलाऊ निर्णय घेतल्याचा आरोप होत आहे. या प्रकारामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून मदतीचा गाजावाजा करणाऱ्यांनी आता या प्रकरणाची जबाबदारी कोणा वर ढकलावी.
अभिजीत दिपके झुरळ जनता पार्टी पीसी : आता मी एक नाही, लाखो तरुण माझ्यासोबत आहेत : अभिजीत दिपके
Comments are closed.