गोकुळ गीतेंच्या माघारीनंतर महायुतीचे ‘ऑपरेशन ठाणे’, सर्व नगरसेवकांना अज्ञातस्थळी नेणार; नाशिकमध
नाशिक विधान परिषद निवडणूक 2026: विधान परिषद निवडणुकीच्या (Vidhan Parishad Election 2026) पार्श्वभूमीवर नाशिकच्या राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी घडत आहेत. निवडणुकीतील संभाव्य दगाफटका टाळण्यासाठी महायुतीने (Mahayuti) आपल्या सर्व मतदारांना म्हणजेच नगरसेवकांना तातडीने ‘ठाणेबंदी’ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. मतफुटी रोखण्यासाठी महायुतीकडून ‘ऑपरेशन ठाणे‘ (Operation Thane) मोहीम हाती घेण्यात आली असून, सर्व मतदारांना ठाण्यातील एका अज्ञातस्थळी हलविण्यात येत आहे. मतदानाच्या दिवशीच या सर्व मतदारांना थेट नाशिकमध्ये आणले जाणार आहे.
तत्पूर्वी, नाशिकमध्ये झालेल्या महायुतीच्या एका महत्त्वाच्या बैठकीत मंत्र्यांकडून मतदान प्रक्रियेबाबत मतदारांना विशेष मार्गदर्शन करण्यात आले. “महायुतीच्या अधिकृत उमेदवारालाच मतदान करा,” अशा कडक आणि स्पष्ट सूचना मतदारांना देण्यात आल्या आहेत. भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गीते (Gokul Gite) प्रकरणानंतर महायुतीने आपली रणनीती (Strategy) अधिक कडक केल्याची माहिती समोर येत आहे.
Nashik Vidhan Parishad Election 2026: गोकुळ गीतेंनी माघार घेतली, पण…
नाशिक विधान परिषद निवडणुकीतील भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गीते यांनी अखेर आपली उमेदवारी मागे (Withdrawal) घेतली खरी, मात्र ही माघार घेताना नाशिकमध्ये आज एक अत्यंत नाट्यमय आणि अभूतपूर्व प्रसंग पाहायला मिळाला. महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे (Narendra Darade) यांच्या शेजारी बसून गोकुळ गीते यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली. मात्र, पत्रकारांनी जेव्हा थेट प्रश्न विचारला की, “नरेंद्र दराडे यांना तुमचा अधिकृत पाठिंबा आहे का?” या प्रश्नावर गोकुळ गीते यांनी कोणतेही उत्तर दिले नाही आणि ते ताडकन उठून तिथून निघून गेले. यामुळे महायुतीचा हा समेट केवळ नावापुरताच आहे का? अशी जोरदार चर्चा आता रंगू लागली आहे.
Nashik Vidhan Parishad Election 2026: गोकुळ गीतेंनी व्यक्त केली होती मनातील खदखद
पत्रकार परिषदेत बोलताना गोकुळ गीते यांनी आपल्या मनातील संताप जाहीरपणे बोलून दाखवला. ते म्हणाले, “ही जागा भाजपच्या माध्यमातून गणेश गीते (Ganesh Gite) यांना दिली जावी, असा शब्द दिला होता. मात्र ही जागा शिंदे गटाला सुटल्याने वातावरण दूषित झाले. १ जूनला अर्ज भरला, त्यानंतर आम्हाला फोन आले की तुम्ही थांबले पाहिजे. गिरीश महाजन (Girish Mahajan) यांचा कृपाआशीर्वाद आमच्या पाठीशी आहे. भविष्यात अशी काही संधी आली तर आमचा विचार करतील, असा शब्द त्यांनी दिला आहे. मुंबईत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा झाली. माझ्या नावापुढे ‘गिरीश महाजनांचे निकटवर्तीय’ आणि ‘बंडखोर’ अशा संज्ञा वापरल्या जात आहेत, म्हणूनच मी माघार घेत आहे,” असे त्यांनी सांगितले होते. यानंतर आता विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या नगरसेवकांना ठाण्यातील अज्ञातस्थळी हलविण्याचा निर्णय घेण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
Jalgaon MLC Election Special Report : नाशकातील बंडखोरी मिटली, पण जळगावचा पेच कायम! शिवसेनेच्या रेश्मा काळे ‘नॉट रिचेबल’!
Comments are closed.